
पुणे ः गळीत हंगाम सुरू होऊन जवळपास महिना झाला आहे. या कालावधीत साखर कारखान्यांनी (sugar factory) गळीत बऱ्यापैकी सुरू केला आहे. पुणे जिल्ह्यात सहकारी आणि खासगी अशा एकूण १७ साखर कारखान्यांपैकी १५ कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केला आहे. आत्तापर्यंत झालेल्या ऊस गाळपात बारामती (Baramati) अॅग्रोने आघाडी घेतली आहे, अशी माहिती प्रादेशिक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.
चालू वर्षी १५ ऑक्टोबरपासून साखर कारखान्यांनी गळीत हंगामास सुरुवात केली असली, तरी हळूहळू साखर कारखाने सुरू होत आहेत. जिल्ह्यात अद्यापही दोन कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केलेला नाही. परतीच्या पावसाने चांगलाच दणका दिला होता. साखर कारखान्याच्या गळीत हंगामात काही प्रमाणात अडचणी आल्या आहेत. अनेक ठिकाणी उसामध्ये पाणी साचल्याने ऊसतोड बंद ठेवावी लागली होती. त्यामुळे साखर कारखान्याचा गळीत हंगाम धीम्यागतीने सुरू होत आहे.
जिल्ह्यातील पूर्व व उत्तर भागात उसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. गेल्या वर्षी वेळेवर झालेल्या पावसामुळे उसाच्या मोठ्या प्रमाणात लागवडी झाल्या. त्यापैकी यंदा गाळपासाठी सुमारे एक लाख ५७ हजार ५७० हेक्टरवरील ऊस उपलब्ध आहे. शासनाने १५ ऑक्टोबरपासून साखर कारखाने सुरू करण्याचे आदेश दिले होते.
सध्या सुरू कारखान्यांमध्ये सहकारी ९ व खासगी ६ साखर कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांची दैनंदिन गाळपक्षमता एक लाख एक हजार ७५० टन आहे. आतापर्यंत सुरू झालेल्या १५ कारखान्यांनी २४ लाख २२ हजार १६८ टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून २० लाख ३७ हजार ४७० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. साखर उतारा सरासरी ८.४१ टक्के आहे.
सोमेश्वर’ची उताऱ्यात आघाडी
आतापर्यंतच्या गाळपात बारामती अॅग्रोने आघाडी घेतली आहे. या कारखान्याने तीन लाख ९३ हजार ७० टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून दोन लाख ८० हजार ९०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. तर साखर उतारा सरासरी ७.१५ टक्के आहे. तर श्री सोमेश्वर साखर कारखान्याने साखर उताऱ्यात आघाडी घेतली आहे. या कारखान्याचा १०.१ टक्के एवढा साखर उतारा आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.