Agrowon Exhibition Agrowon
ॲग्रो विशेष

Agrowon Exhibition : छत्रपती संभाजीनगराला आजपासून येणार कृषी पंढरीचे रूप

Team Agrowon

Pune News : कोरडवाहू शेतीमधील सुधारित पद्धतीपासून ते ज्ञान तंत्रज्ञान आधारित अत्याधुनिक शेतीचे परिपूर्ण दर्शन घडविणाऱ्या ‘सकाळ-अॅग्रोवन’च्या ‘अॅग्री एक्स्पो-२०२४’ प्रदर्शनाला गुरुवारी (ता. ११) भव्य प्रारंभ होत आहे. या कृषी पंढरीचे वारकरी होण्यासाठी गावागावांमधील शेतकरी उत्साहाने छत्रपती संभाजीनगरात दाखल होत आहेत.

छत्रपती संभाजीनगरमधील जालना रोडलगत असलेल्या श्रीराम मंदिर ट्रस्ट मैदानावर (केंब्रिज स्कूलजवळ) रविवारपर्यंत (ता. १४) सकाळी दहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत प्रदर्शन मोफत बघता येणार आहे.

या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक जी. के. एनर्जी सोलर पंप हे आहेत. इकोजेन सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेसर्स बी. जी. चितळे डेअरी (भिलवडी, सांगली), इंडियन फार्मर्स फर्टिलायझर्स को-ऑपरेटिव्ह लिमिटेड (इफ्को), तसेच कृषी विभाग-महाराष्ट्र राज्य व ‘आत्मा’ विभागाच्या संयुक्त विद्यमाने प्रदर्शन साकारते आहे.

ट्रॅक्टर, टिश्यू कल्चर, ठिबक व तुषार सिंचन प्रणाली, तसेच बियाणे, खते, कीटकनाशके, हरितगृह उभारणी, यंत्रे व अवजारे, पीक काढणी व कापणी यंत्रे, प्रक्रिया उद्योग, पॅकेजिंग, कोल्ड स्टोअर क्षेत्रातील कंपन्या तसेच शेतकरी उत्पादक कंपन्या (एफपीसी) या प्रदर्शनात सहभागी होत आहेत. याशिवाय शासनाचे विविध विभाग, कृषी संशोधन संस्था, नामवंत बॅंका, कृषी शिक्षण संस्था या प्रदर्शनात सहभागी होत आहेत.

‘लढा दुष्काळाशी’..विशेष दालन उपलब्ध

यंदाच्या कृषी प्रदर्शनात ‘यशस्वीपणे लढा दुष्काळाशी’ असा संदेश दिला जाणार आहे. या संबंधीच्या यशकथांचे स्वतंत्र दालन प्रदर्शनात उपलब्ध आहे. पाणीटंचाईतील फळबाग व्यवस्थापन, दुष्काळी स्थितीला सहनशील पिकांची लागवड, नफ्याची रेशीम शेती असे विषय शेतकऱ्यांना सहजसोप्या पद्धतीने सांगितले जाणार आहेत.

‘ट्रॅक्टर’चा भाग्यवान मानकरी कोण?

अॅग्रोवनच्या प्रदर्शनात ‘लकी ड्रॉ’द्वारे एका शेतकऱ्याला ट्रॅक्टर भेट मिळणार आहे. या भाग्यवान मानकऱ्याबाबत उत्सुकता लागून आहे. ‘लकी ड्रा’मध्ये सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी आज सकाळी प्रदर्शनस्थळी येताच नोंदणी अर्ज भरून द्यावा. अर्जात भ्रमणध्वनीसह माहिती भरावी व शेजारच्या ‘ड्रॉप बॉक्स’मध्ये नोंदणी अर्ज टाकावा. शनिवारी (ता. १४) दुपारी तीन वाजता ‘लकी ड्रॉ’ काढला जाणार आहे.

आजच्या (ता. ११) चर्चासत्रांचे विषय

विषय : रेशीम शेतीमधील आर्थिक संधी

वेळ : २ ते ४

तज्ज्ञ :

१) महेंद्र ढवळे, उपसंचालक, रेशीम विभाग, महाराष्ट्र राज्य

२) बी. डी. डेंगळे, जिल्हा रेशीम विकास अधिकारी, छत्रपती संभाजीनगर

३) अजय मोहिते, जिल्हा रेशीम विकास अधिकारी, जालना

४) दिलीप हाके, माजी उपसंचालक, रेशीम विभाग

५) प्रयोगशील शेतकरी सदाशिव गिते, देवगाव, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर

६) प्रयोगशील शेतकरी सिद्धेश्वर भानुसे, बोरगाव, ता. घनसावंगी, जि. जालना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Village Development : एकात्मिक प्रयत्नांतून आर्थिक संपन्न गाव निर्मिती शक्य

Milk Production Issue : भ्रूण प्रत्यारोपित कालवडी वाटपाची घाई कशाला?

Artificial Intelligence : केंद्र सरकारकडून दिल्लीत ३ कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सेंटर्स स्थापन करण्याची घोषणा

Crop Protection : पीक संरक्षणासाठी बीजप्रक्रिया महत्त्वाची

Hasan Mushrif : 'शक्तीपीठ' महामार्ग बाधित शेतकरी आक्रमक, मुश्रीफ यांच्या वाहनांचा ताफा अडविला

SCROLL FOR NEXT