Agriculture Innovation Agrowon
ॲग्रो विशेष

Agro Input Summit: कृषी निविष्ठा उद्योग परिषदेत होणार जैव उत्तेजकांवर मंथन

AIM B2B Conclave: कृषी निविष्ठा उद्योगाच्या वाढीसाठी आणि जैव उत्तेजक क्षेत्रातील आव्हानांवर प्रकाश टाकण्यासाठी पुण्यात दोन दिवसीय ‘एम बीटूबी कॉन्क्लेव्ह २०२५’ परिषद आयोजित केली जात आहे.

Team Agrowon

Pune News: देशातील जैव उत्तेजके उद्योगासमोरील आव्हाने व संधीवर प्रकाश टाकणारी दोन दिवसीय कृषी निविष्ठा उद्योग परिषद येत्या ३ व ४ मार्च रोजी पुण्यात होत आहे.
‘एम’अर्थात ‘ॲग्रो इनपुट्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ने निविष्ठा उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘एम बीटूबी कॉन्क्लेव्ह २०२५’ या परिषदेसोबतच प्रदर्शनाचेही आयोजन केले आहे.

परिषदेला राज्याचे कृषी आयुक्त सूरज मांढरे, निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाचे संचालक सुनील बोरकर, कृषी शास्त्रज्ञ डॉ. प्राजिब चक्रवर्ती, डॉ. एस. के. सक्सेना, डॉ. कौशिक बॅनर्जी, डॉ. हरिहर कौसडीकर तसेच ‘अॅग्रोवन’चे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण यांच्यासह राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे.

‘एम’च्या प्रदर्शनात राष्ट्रीय पातळीवरील खते, कीटकनाशके, जैव उत्तेजके, प्रिंटिंग बॉटल्स, पॅकेजिंग, पाऊचेस, उपकरणे, प्रयोगशाळा सामग्रीची माहिती देणारी दालने असतील. या प्रदर्शनामुळे गुणवत्तापूर्ण कच्चा माल, वेष्टन सामुग्री, यंत्र, उपकरणांची माहिती उद्योजकांना एका छताखाली मिळणार आहे.

तसेच, परिषदेतील बिझनेस-टू-बिझनेस उपक्रमामुळे राज्यातील सध्याचे उद्योग व नवउद्योजकांना व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. पुण्याच्या ‘द वेस्टिन हॉटेल’मध्ये होत असलेल्या या दोन दिवसीय परिषदेची माहिती ८२६३९४०६८४ व ९६८९१५२८३७ या क्रमांकावर मिळेल, अशी माहिती संयोजकांनी दिली.

‘‘गावपातळीवरील शेतीमधील अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या समस्यांपासून ते उच्च तंत्रज्ञानावर आधारित शेतीचा आढावा या परिषदेत घेतला जाणार आहे. कृषी निविष्ठा उद्योग परिषदेत विशेषतः जैव उत्तेजकांवर मंथन होईल. शेतीमधील उच्च तंत्रज्ञानाची नावीन्यपूर्ण उत्पादने सादर होणार होतील. तसेच, देशी व जागतिक निविष्ठा क्षेत्रातील नियमन व समस्यांवर चर्चा होणार आहे. कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना यंदा विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे,’’ असे ‘एम’चे सचिव समीर पाथरे यांनी सांगितले.

देशाच्या कृषी निविष्ठा क्षेत्रात जैव उत्तेजकांची भूमिका मोलाची आहे. या क्षेत्राला चालना देण्यात ‘एम’ची राष्ट्रीय परिषद मैलाचा दगड ठरेल.
राजकुमार धुरगुडे पाटील, अध्यक्ष, ‘एम’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT