Cotton Productivity : ‘एचडीपीएस’ मधून कापूस उत्पादकता वाढ ; राकेश मेहरा ः अतिसघन कापूस लागवड प्रकल्पाचा आढावा

Cotton Production : पारंपरिक लागवड पद्धतीच्या तुलनेत अतिसघन कापूस प्रकल्पातून कापूस उत्पादनात तिपटीने वाढ झाली आहे. शेतकऱ्यांना आर्थिक सक्षमता निर्माण होण्याबरोबरच यातून देशातील कापूस साखळीला मोठी मदत होईल, असा आशावाद कॉन्फेडेरेशन ऑफ इंडियन टेक्‍सटाईल इंडस्ट्रीजचे अध्यक्ष राकेश मेहरा यांनी व्यक्‍त केला.
Cotton Production
Cotton ProductionAgrowon
Published on
Updated on

Cotton Crop : नागपूर ः पारंपरिक लागवड पद्धतीच्या तुलनेत अतिसघन कापूस प्रकल्पातून कापूस उत्पादनात तिपटीने वाढ झाली आहे. शेतकऱ्यांना आर्थिक सक्षमता निर्माण होण्याबरोबरच यातून देशातील कापूस साखळीला मोठी मदत होईल, असा आशावाद कॉन्फेडेरेशन ऑफ इंडियन टेक्‍सटाईल इंडस्ट्रीजचे अध्यक्ष राकेश मेहरा यांनी व्यक्‍त केला.

भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण तसेच वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या संयुक्‍त सहकार्याने कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन टेक्‍सटाईल इंडस्ट्रीज यांच्या माध्यमातून अतिसघन कापूस लागवड प्रकल्प राबविला जात आहे. कापूस उत्पादकता वाढीच्या अनुषंगाने राबविण्यात येत असलेल्या या प्रकल्पातील महाराष्ट्र, मध्य प्रदेश व राजस्थान या तीन झोनची आढावा सभा नुकतीच पार पडली. या बैठकीत श्री. मेहरा बोलत होते.

Cotton Production
Cotton Production : कापूस उत्पादकता वाढीसाठी आता ‘एचडीपीएस’चा डोस

या वेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सी. डी. मायी, केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद, केंद्रीय कृषी मंत्रालयाचे संचालक अरविंद वाघमारे, प्रशांत मोहोता, चंद्रिमा चॅटर्जी, गोविंद वैराळे यांची या वेळी उपस्थिती होती. टी. राजकुमार यांनी कापसाचे अधिक उत्पादन झाल्यास वस्त्रोद्योग क्षेत्राला कापूस आयात करण्याची आवश्‍यकता राहणार नाही, अशी भूमिका मांडली. डॉ. वाय. जी. प्रसाद यांनी सीआयसीआरच्या माध्यमातून प्रभावीपणे अतिसघन, सघन आणि लांब धाग्याच्या कापूस उत्पादनाचा प्रकल्प राबविण्यात येत आहे.

देशातील आठ राज्यांमध्ये राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पाचे सकारात्मक परिणाम समोर आले आहेत असल्याचे सांगितले. प्रशांत मोहोता यांनी वस्त्रोद्योग क्षेत्रासमोरील असलेली आव्हाने व त्यावरील उपाययोजना यावर चर्चा केली. अरविंद वाघमारे यांनी आठही राज्यांत या प्रकल्पाला शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद असल्याचे सांगितले.

चंद्रिमा चॅटर्जी यांनी हा प्रकल्प कापसाची शाश्‍वत उत्पादकता वाढीसाठी पूरक ठरल्याचे मत मांडले. वर्धा जिल्ह्यातील शेतकरी दिलीप पोहाने यांनी या प्रकल्पाच्या बळावर एकरी २४ क्‍विंटलपर्यंतचा पल्ला गाठता आला, असे सांगितले. या वेळी प्रकल्पाअंतर्गत अधिक उत्पादकता घेणारे शेतकरी, कापूस तज्ज्ञ यांना पुरस्कृत करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com