Nursery Management Agrowon
ॲग्रो विशेष

Nursery Management : शास्त्रशुद्ध रोपवाटिका उभारून कृषी क्षेत्राला बळकटी द्यावी

Agriculture Nursery : कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव व आत्मा, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव येथे ‘रोपवाटिका व्यवस्थापन’ या विषयावर शेतकऱ्यांसाठी चार दिवसीय प्रशिक्षण पार पडले.

Team Agrowon

Satara News : कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव व आत्मा, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव येथे ‘रोपवाटिका व्यवस्थापन’ या विषयावर शेतकऱ्यांसाठी चार दिवसीय प्रशिक्षण पार पडले.

या प्रशिक्षणात प्रो ट्रे तंत्रज्ञान वापरून भाजीपाल्याची व ऊस रोपे तयार करणे, फळपिकांची कलम बांधण्याचे प्रात्यक्षिक, ठिबक संचाची निवळ व देखभाल, संरक्षित गृहाची माहिती उपस्थित तज्ंज्ञानी दिली.

तसेच ठिबक ऑटोमायझेशन युनिटला व विविध रोपवाटिकांना भेट देण्यात आली. या वेळी प्रकल्प संचालक आत्मा विकास बंडगर, नाबार्ड उपमहाव्यवस्थापक श्री. चौधरी, श्री. पाटील, डॉ. दर्शन कदम, डॉ महेश बाबर उपस्थित होते.

प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना श्री चौधरी म्हणाले, ‘‘ग्रामीण युवकांनी रोपवाटिका व्यवसाय करून चांगल्या दर्जेदार कलमांची उपलब्धता करावी. श्री बंडगर यांनी प्रशिक्षणादरम्यान मिळालेल्या तांत्रिक माहितीचा वापर करून शास्त्रशुद्ध रोपवाटिका उभारणी करावी, त्यासाठी प्रत्येक पावलावर आत्मा व कृषी विज्ञान केंद्राची मदत मिळणार,’’ असे त्यांनी नमूद केले.

श्री. पाटील म्हणाले, की रोपवाटिका उभारण्यासाठी जिल्हा अग्रणी बँक कर्ज पुरवठा संदर्भात संपूर्ण माहिती व सहाय्य करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रम समनव्यक डॉ. महेश बाबर यांनी कृषी विज्ञान केंद्र बोरगाव यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. डॉ कल्याण बाबर यांनी आभार मानले. श्रीकांत घोरपडे, विशाल घाडगे, गौरी जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mango Crop: आंबा उत्पादनात ५० टक्के घट होण्याचा अंदाज

Maize Farmers: मका उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या

Cotton Purchase: हमीभावाचा आधार नाही; कापूस गेला कमी दरात

Animal Market Action: लकडगंजमधील वन्यजीवांच्या बेकायदा बाजारावर होणार कारवाई

Natural Farming: नांदेडला डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियानाला गती

SCROLL FOR NEXT