Team Agrowon
राज्यातील खासगी रोपवाटिकांना परवाना देण्याची ऑफलाइन पद्धत आता कायमची बंद करण्यात आली आहे.
शासकीय संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी केल्याशिवाय रोपवाटिका चालकांना परवाना मिळणार नाही,
फलोत्पादन संचालनालयाने राज्यातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व विभागीय सहसंचालकांना या बाबत सूचना दिल्या आहेत.
महाराष्ट्र फळांचे रोपमळे नियमन अधिनियम १९६९ मधील तरतुदीनुसार आता खासगी फळांच्या रोपमळ्यांना परवाना देण्यासाठी ऑनलाइन प्रणालीचा वापर अनिवार्य करण्यात आल्याचे संचालनालयाने सूचित केले आहे.
रोपवाटिकांना परवाना देण्याचे अधिकार उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांना आहेत. सध्या परवाने देताना ऑफलाइन पद्धत वापरली जात असून ती पारदर्शक नाही. तसेच, रोपवाटिका चालकांची बिनचूक माहितीदेखील उपलब्ध नाही.
रोपवाटिकांसाठी मातृवृक्ष कोठून आणली याची माहितीदेखील शासनाला द्यावी लागेल. या पद्धतीमुळे यामुळे शेतकऱ्यांना दर्जेदार रोपे व कलमांचा पुरवठा होण्यात मदत मिळेल.
रोपवाटिका चालकांनी https://aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर माहिती दिली तरच परवाना मिळणार आहे.