Suresh Dhas Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Scam: कृषी अधिकाऱ्यांनी संबंधित कंपन्यांची तपासणी टाळली; आमदार सुरेश धस यांचे गंभीर आरोप

MLA Suresh Dhas: राज्यातील कृषी खात्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून निविष्ठा कंपन्यांमध्ये अधिकाऱ्यांची छुपी भागीदारी असल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. याप्रकरणी सरकारकडे सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

Team Agrowon

Pune News: माजी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या काळात गुणनियंत्रण संचालकांच्या मदतीने कृषी खात्यातील अधिकाऱ्यांनी छुप्या पद्धतीने काही निविष्ठा कंपन्यांमध्ये भागीदारी मिळवली आहे. त्यामुळेच या कंपन्यांची तपासणी गुणनियंत्रण निरीक्षकांकडून कधीही केली जात नाही, असा आरोप करणारे पत्र आमदार सुरेश धस यांनी राज्य सरकारला पाठवले आहे.

निरीक्षकांचे धाबे दणाणले आमदार धस यांनी अलीकडेच एक पत्रकार परिषद घेऊन कृषी विभागातील गुणनियंत्रण कामकाजाशी निगडित पदांवर होत असलेला घोडेबाजार, अधिकाऱ्यांची निविष्ठा कंपन्यांमधील गुंतवणूक तसेच निविष्ठा उद्योगातील गैरप्रकार लपवण्यासाठी अधिकाऱ्यांचा होत असलेला उपयोग या गंभीर मुद्द्यांबाबत पुराव्यानिशी माहिती दिल्यामुळे गुणनियंत्रण निरीक्षकांचे धाबे दणाणले आहे.

‘‘गुण नियंत्रण विभागात जाण्यासाठी अधिकारी वर्ग राजकीय मदत घेतो. गुणनियंत्रणाशी संबंधित पदांवर गेल्यानंतर अधिकारी आपल्याच नातेवाइकांच्या नावाने निविष्ठा कंपन्या काढतात. या कंपन्यांची तपासणी होऊ नये याकरिता काळजी घेतात. तसेच या कंपन्यांमधून तयार होणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या निविष्ठांची खरेदी करण्यासाठी राज्यातील कृषी सेवा केंद्र चालकांवर दबाव आणतात,’’ असाही गंभीर आरोप आमदार धस यांनी केला आहे.

सहसंचालकाच्या मुलाचीही कंपनी एका विभागीय कृषी सहसंचालकाने आपल्या मुलाच्या नावे निविष्ठा विक्रीचा उद्योग उभारला तसेच सेंद्रिय खताची निर्मिती करणारी एक कंपनी देखील स्थापन केली. खत निर्मितीशी संबंधित उत्पादन, विक्री, पुरवठा अशा विविध कामकाजाशी संबंधित परवाने वाटपात गुणनियंत्रण विभागातील अधिकारी उघडपणे व्यवहार करतात. या विभागाने जी-१ व जी-२ परवाने देताना राज्यातील कंपन्यांकडून प्रतिग्रेड १४ हजार रुपये बेकायदा उकळले आहेत.

या अधिकाऱ्यांनी दीड हजार परवाने वाटले असून प्रति परवाना दोन ते पाच लाख रुपये गोळा केले आहेत. या कामासाठी एक माजी कृषिमंत्री व दोन संचालकांची मदत घेत गुणनियंत्रण विभागातील तत्कालीन अधिकाऱ्याच्या मदतीने मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झालेला आहे. या बाबत आपण राज्य सरकारला पत्र पाठवले आहे. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही भेटून आपण सखोल चौकशीची मागणी करणार आहोत, असेही आमदार धस यांनी पत्रकारांना सांगितले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT