Sugarcane Waste Management : ऊस पाचटापासून सेंद्रिय खताची निर्मिती ; शेतकऱ्यांसाठी फायदेशीर उपाय

Organic Fertilization : एका एकरातून ५ ते ६ टन पाचट मिळते. त्यापासून २ ते ३ टन उत्तम प्रतीचे सेंद्रिय खत बनते. त्यामधून १६ ते २० किलो नत्र, ८ ते १२ किलो स्फुरद, ३० ते ४० किलो पालाश इत्यादी अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. सेंद्रिय पदार्थामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
Sugarcane Waste Management
Sugarcane Waste ManagementAgrowon
Published on
Updated on

पांडुरंग काळे, राजेंद्र वावरे

Sugarcane Farming : एका एकरातून ५ ते ६ टन पाचट मिळते. त्यापासून २ ते ३ टन उत्तम प्रतीचे सेंद्रिय खत बनते. त्यामधून १६ ते २० किलो नत्र, ८ ते १२ किलो स्फुरद, ३० ते ४० किलो पालाश इत्यादी अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. सेंद्रिय पदार्थामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.

ऊस तुटून गेल्यानंतर त्याच्या वजनाच्या १० ते १२ टक्के पाचट मिळते. एकरी ५ ते ६ टन पाचट मिळते. पाचटामध्ये ०.४ ते ०.५ टक्के नत्र, ०.१५ ते ०.२० टक्के स्फुरद, ०.७ ते १ टक्का पालाश आणि ३२ ते ४० टक्के सेंद्रिय कर्ब असतो. त्यासोबत इतरही अन्नद्रव्ये, जसे की कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, सल्फर, लोह, मॅगेनीज व झिंक इत्यादी अन्नद्रव्ये असतात. जेव्हा पाचट जाळले जाते, तेव्हा त्यातील सेंद्रिय कर्बाचा पूर्णपणे नाश होतो.

९० टक्यांहून अधिक नत्र व स्फुरद नष्ट होतो. केवळ काही प्रमाणात पालाश शिल्लक राहतो. पाचट जाळल्यामुळे आपण कित्येक टन नत्र, स्फुरद, पालाश, सूक्ष्म अन्नद्रव्य व सोबतच बहुमूल्य सेंद्रिय पदार्थांचा नाश करत असतो. पाचट न जाळता त्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास पुढील पिकास भरपूर प्रमाणात सेंद्रिय खत उपलब्ध करून जमीन सुपीक ठेवू शकतो.

Sugarcane Waste Management
AI in Sugarcane Farming : ऊस उत्पादन, उत्पादकतेसाठी एआयचा वापर करा : देवेंद्र फडणवीस

जागच्या जागी पाचट कुजविण्याची पद्धत खोडवा उसामध्ये पाचट

कुजविण्याची पद्धत

खोडव्यामध्ये पाचट सरीआड सरी किंवा प्रत्येक सरीत ठेवू शकतो.

तोडणीनंतर उसाच्या बुडख्यावर असलेले पाचट बाजूला सरीमध्ये लोटावे.

उसाचे बुडखे मोठे राहिल्यास ते जमिनीलगत धारदार कोयत्याने छाटून घ्यावेत.

बुडख्यांच्या छाटणीनंतर लगेच १ ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यामुळे मातीतून होणाऱ्या बुरशीजन्य रोगांचा प्रतिबंध होतो.

शेतात सरीमध्ये ठेवलेल्या पाचटावर प्रति एकरी ३२ किलो युरिया आणि ४० किलो सिंगल सुपर फॉस्फेट पसरावे. त्यानंतर ४ किलो पाचट कुजविणारे जीवाणू संवर्धक ओलसर मातीमध्ये मिसळून समप्रमाणात पाचटावर पसरून टाकावे. त्यामुळे पाचट लवकर कुजते.

पाचटामुळे सुरवातीस पाणी पोहोचण्यास वेळ लागतो. तरी सर्वत्र पाणी बसेल याकडे लक्ष द्यावे. जमीन ओली असताना सरीतील पाचट पायाने दाबून घ्यावे किंवा जनावरांच्या पायाने दाबून घ्यावे. पाचटाचा मातीशी संबंध येऊनहळूहळू कुजण्याची क्रिया सुरु होते.

खोडव्याला पाणी दिल्यानंतर ३ ते ४ दिवसांनी वापसा आल्यावर रासायनिक खतांची पहिली मात्रा द्यावी. - खते पहारीसारख्या अवजाराच्या साह्याने जमिनीत वापसा असताना, दोन समान हप्त्यांत द्यावी. पहिली खतमात्रा १५ दिवसांच्या आत पूर्ण करावी. यासाठी पहारीने बुडख्यापासून १० ते १५ सेंमी अंतरावर वरंब्याच्या बगलेत १५ ते २० सेंमी खोल छिद्र घेऊन त्यामध्ये ३० सेंमी अंतर ठेवून सरीच्या एका बाजूला पहिली खतमात्रा द्यावी. दुसरी खतमात्रा विरुद्ध बाजूस त्याच पद्धतीने १३५ दिवसांनी द्यावी.

Sugarcane Waste Management
Sugarcane Management : सुयोग्य व्यवस्थापनाने ऊस खोडव्यात चांगले उत्पादन

ऊस तोडणी यंत्राने तोडणी केली असल्यास बुडख्यांवरील पाचट बाजूला करणे किंवा बुडखे छाटणे ही कामे करावी लागत नाहीत. कारण यंत्राने पाचटाचे आपोआपच लहान तुकडे होतात. जमिनीवर सारख्या प्रमाणात हलकासा पाचटाचा धर तयार होतो. तोडणी जमिनी लगतच होत असल्याने पुन्हा बुडखे छाटण्याची ही गरज नाही. यंत्राने ऊस तोडणी केल्यास खोडवा चांगला फुटतो.

उसाचा खोडवा काढून टाकावयाचा असल्यास पाचट कुजविण्याची पद्धत

खोडवा ऊस तोडणीनंतर पाचट शेतात एकसारखे पसरून चांगले वाळू द्यावे.

पाचट कुट्टी यंत्राच्या साहाय्याने पाचटाचे बारीक तुकडे करून घ्यावेत.

पाचट कुजविण्यासाठी प्रति एकरी ३२ किलो युरिया आणि ४० किलो सिंगल सुपर फॉस्फेट टाकावे. त्यानंतर ४ किलो पाचट कुजविणारे जीवाणू संवर्धक ओलसर मातीमध्ये मिसळून समप्रमाणात पाचटावर पसरून टाकावे. त्यामुळे पाचट लवकर कुजते.

ऊस बुडखा आणि मुळ्यांचे लहान तुकडे करण्यासाठी आणि काढण्यासाठी रोटाव्हेटरचा वापर करावा.

साखर कारखान्यातील प्रक्रिया केलेले प्रेसमड कंपोस्ट एकरी एक टन पाचटावर टाकल्यास पाचट लवकर कुजण्यास मदत होते.

पलटीच्या साह्याने पाचट जमिनीत गाडावे. आवश्यकता असल्यास शेतास पाणी द्यावे. २ ते ३ महिन्यात पाचट चांगल्या प्रकारे कुजवून जमिनीची सुपीकता वाढविता येते.

पाचट ठेवल्यानंतर होणारे फायदे

पाचट आच्छादनामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन शेतात ओलावा जास्त काळ टिकून राहतो.

एक एकरातून ५ ते ६ टन पाचट मिळते. त्यापासून २ ते ३ टन उत्तम प्रतीचे सेंद्रिय खत बनते. त्यामधून १६ ते २० किलो नत्र, ८ ते १२ किलो स्फुरद, ३० ते ४० किलो पालाश इत्यादी अन्नद्रव्ये उपलब्ध होतात.

सेंद्रिय पदार्थामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.

पाचट आच्छादनामुळे तणांचा प्रादुर्भाव खूपच कमी होतो.

जमिनीचे तापमान ३ ते ५ अंश सेल्सिअस कमी राहते.

जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढल्यामुळे पुढील पिकाच्या उत्पन्नात १० ते १२ टक्के वाढ होते.

गांडूळ आणि उपयुक्त जिवाणूंची संख्या वाढते. त्यामुळे जमीन भुसभुशीत होऊन हवा खेळती राहते.

- पांडुरंग काळे, ७३५०८४४१०१

(विषय विशेषज्ञ (कृषीविद्या), श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र, कणेरी, ता. करवीर, जि. कोल्हापूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com