Bribe Agrowon
ॲग्रो विशेष

Bribe News : कृषी अधिकारी जाधव ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

Arrest In Bribe : सेंद्रिय खतांच्या विक्री दुकानाचा परवाना देण्यासाठी नऊ हजारांची लाच घेताना मंगळवारी (ता. २८) कृषी अधिकाऱ्याला पकडण्यात आले.

Team Agrowon

Kolhapur News : सेंद्रिय खतांच्या विक्री दुकानाचा परवाना देण्यासाठी नऊ हजारांची लाच घेताना मंगळवारी (ता. २८) कृषी अधिकाऱ्याला पकडण्यात आले. सुनील जगन्नाथ जाधव (वय ५०, सध्या रा. जाधववाडी, कोल्हापूर, मूळ रा. शाहूपुरी, सातारा) असे त्याचे नाव आहे.

तो वर्ग दोनचा अधिकारी असून, राजर्षी शाहू मार्केट यार्ड परिसरात सायंकाळी कारवाई करत जाधवला अटक केली, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सरदार नाळे यांनी दिली.

नाळे यांनी कारवाईबाबत दिलेली माहिती अशी, की तक्रारदाराने बियाणे, खते आणि कीटकनाशकांची विक्री करण्यासाठी दुकानाचा परवाना मिळावा, अशी मागणी ऑनलाइन आणि ऑफलाइनने अशा दोन्ही पद्धतींनी जिल्हा कृषी कार्यालयाकडे केली होती.

अर्ज पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठांकडे पाठवल्याबद्दल सुनील जाधव याने तक्रारदाराकडे दहा हजार रुपये लाच मागितली. चर्चेनंतर नऊ हजारांवर तडजोड झाली. त्यानुसार रक्कम देण्याचे ठरले होते. त्यानुसार सायंकाळी पाचच्या सुमारास जाधवला तक्रारदाराकडून लाच घेताना अटक केली.

त्यानंतर पथकाने जाधव याच्या जाधववाडी येथील घराची झडती घेतली. त्यानंतर सातारा येथील घराची झडती घेण्यासाठी पथक रवाना झाले आहे. पोलिस निरीक्षक आसमा मुल्ला, उपनिरीक्षक संजीव बंबरगेकर यांच्यासह अजय चव्हाण, विकास माने, सचिन पाटील, सुधीर पाटील, विष्णू गुरव यांच्या पथकाने कारवाई केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Relief : पिण्याचे पाणी, पीक नुकसान, चारा व्यवस्थापनावर भर

Gaushala Empowerment : गो-१० संकल्पा’तून गोशाळांना आर्थिक स्वावलंबनाचे बळ

Seed Planning : रब्बी हंगामासाठी ७,७८४ क्विंटल बियाण्यांचे नियोजन

Sugarcane Price : ‘नॅचरल’कडून उसाला पहिली उचल ३,३०० रुपये

Sangli Development : सांगली जिल्ह्यात २८ हजार कामांना मान्यता

SCROLL FOR NEXT