Shivrajsingh Chauhan Agrowon
ॲग्रो विशेष

Shivraj Singh Chauhan : नाटक करून शेतकऱ्यांचे हित साधता येणार नाही; शिवराज यांचे काँग्रेसवर टीकास्त्र 

Shivraj Singh Chauhan On Congress : कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सोमवारी (ता.५) राज्यसभेत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या कामकाजावरील चर्चेला उत्तर देताना काँग्रेसवर टीका केली. 

Aslam Abdul Shanedivan

Pune News : गेल्या आठवड्यात कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या कामकाजावरील चर्चेवरून काँग्रेस नेते खासदार रणदीप सुरजेवाला यांनी राज्यसभेत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यावर कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सोमवारी (ता.५) राज्यसभेत उत्तर दिले आहे. चौहान म्हणाले, कॉँग्रेसने कधीच पंतप्रधान सन्मान निधी योजनेसारखी योजना आणली नाही. तसेच या योजनेतून शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मिळत असले तरीही या अल्पशा रक्कमेतून अल्पभूधारक आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आधार मिळतो. या रक्कमेमुळे शेतकऱ्यांचा मान वाढला असून शेतकरी स्वावलंबी बनला आहे. शेतकऱ्यांच्या विकासाला गती मिळाली आहे. मात्र शेतकऱ्यांचा आदर काँग्रेस पाहू शकत नाही असा टोलाही चौहान यांनी कॉँग्रेसला लगावला. तर यावेळी शेतकऱ्यांवरील गोळीबाराच्या मुद्द्यावरून काँग्रेसच्या खासदारांनी गोंधळ घातल्याने चौहान आक्रमक झाले. 

यावर चौहान यांनी दिग्विजय सिंह यांना धारेवर धरत काँग्रेसचे हात शेतकऱ्यांच्या रक्ताने माखल्याचे म्हटले. दिग्विजय सिंह यांचे हात २४ शेतकऱ्यांच्या रक्ताने माखले आहेत. १९८६ मध्ये बिहारमध्ये काँग्रेसची सत्ता असताना गोळीबार झाला. यात २३ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. १९८८ मध्ये इंदिरा गांधींच्या पुण्यतिथीला दिल्लीत दोन शेतकऱ्यांवर गोळीबार झाला होता. याचदरम्यान मेरठमध्ये शेतकऱ्यांवर गोळीबार झाला ज्यात ५ शेतकरी मारले गेले, असा आरोपही चौहान यांनी केला.

पुढे चौहान यांनी भारत जोडो आणि भारत न्याय यात्रेवरून राहुल गांधी यांचीवर अप्रत्यक्ष टीका केली. ते म्हणाले, त्यांचे नेता राहुल गांधी यात्रेवर निघाला ते ही कॅमेरे घेऊन. राहुल गांधी सोनिपतला गेले होते. तेथे शेतात आधीच कॅमेरे लावले होते. कुठे लक्ष केंद्रित करायचे हे आधीच ठरलेले होतं. शेतात गेल्यावर राहुल गांधी यांनी कॅमेरामनना कुठे उभे राहायचे ? कसे आणि काय करायचे ? अशी विचारणा केली. राहुल गांधी नांगर दाखवल्यावर त्यांनी हे काय आहे अशी विचारणा केली. त्यामुळे शेतकऱ्यांचे कल्याण अशा नाटकांतून होणार नाही, असा टोला चौहान यांनी यावेळी लगावला. 

कृषिमंत्री झाल्यानंतर १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून विविध पंतप्रधानांनी दिलेली भाषणे मी वाचली. यात १९४८ भाषण वगळता काहीच भाषणांत शेतकऱ्यांचा उल्लेख नेहरूंनी केला आहे. नेहरूंच्या १९४७ ते १९६० पर्यंतच्या भाषणात शेतकरी शब्द एकदाही नाही. तर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या भाषणात एक दोनदा शेतकरी शब्द वापरण्यात आला. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १५ ऑगस्टच्या भाषणात शेतकरी या शब्दाचा वारंवार उल्लेख करण्यात आल्याचा दावा चौहान यांनी केला आहे. 

जे पोटात तेच ओठात 

आमच्या पोटात जे आहे तेच ओठावर येते. मात्र काँग्रेसच्या नेत्यांच्या पोटात जे आहे ते ओठावर येत नाही. त्यामुळेच त्यांच्या ओठावर शेतकरी येत नाही. पण मोदीजींच्या हृदयात शेतकरी आहेत, म्हणून ते वारंवार शेतकरी म्हणतात. तर आमचे सरकार शेतकऱ्यांच्या ओळखीसाठी आधार प्रमाणेच एक डिजिटल आयडी तयार करत आहे, जे शेतकऱ्यांच्या जमिनीच्या डेटाशी जोडले जाईल, असं आश्वासनही चौहान यांनी दिलं.

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

Ujani Dam Water : उजनी धरणाचे आज रात्री सोळा दरवाजे उघडणार

Water Stock : सातपुड्यातील प्रकल्पांत जलसाठा वाढला

Agriculture Damage : कालवे वाहते राहिल्याने जमीन नापीक

SCROLL FOR NEXT