Shivraj Singh Chouhan
Shivraj Singh ChouhanAgrowon

Shivraj Singh Chauhan : भारत नैसर्गिक शेतीवर भर देतोय; केंद्रीय कृषिमंत्री चौहान

International Conference of Agricultural Economists : दिल्ली येथे आयोजित कृषी अर्थशास्त्रज्ञांची (ICAE) ३२ वी आंतरराष्ट्रीय परिषद शनिवारी (ता.३) पार पडली. यावेळी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी भारताच्या कृषी क्षेत्राच्या प्रगतीवर भर दिला.
Published on

New Delhi : रसायने आणि खतांच्या अतिवापरामुळे उत्पादित फळे आणि भाजीपाला यांचे शरीरावर विपरित परिणाम होत आहे. तसेच शेत जमिनीचा पोत देखील सातत्याने बिघडत आहे. यामुळेच भारत नैसर्गिक शेतीवर भर देतोय असा दावा केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शनिवारी (ता.३) केला. चौहान राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्र (NASC) कॅम्पसमध्ये कृषी अर्थशास्त्रज्ञांच्या (ICAE) ३२ व्या आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलत होते. या परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. यावेळी जगभरातील कृषी क्षेत्रातील कृषी अर्थतज्ज्ञ उपस्थित होते.

यावेळी देशात वाढत्या उत्पादनाच्या स्पर्धेत जमिनीचा पोत खराब होत आहे. त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पादनासह सर्वसामान्यांच्या आरोग्यावर होत आहे. याची चिंता आणि जाणिव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आहे. त्यामुळे उत्पादन वाढीबरोबरच मानवी शरीर आणि मातीच्या आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी भारत प्रयत्न करत आहे. यासाठी भारत नैसर्गिक शेतीवर भर देत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताचा कृषी विकास जगात सर्वाधिक राहिल्याचे चौहान यांनी म्हटले आहे.

Shivraj Singh Chouhan
Shivraj Singh Chauhan : नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान? केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितला सरकारचा प्लॅन

तसेच चौहान म्हणाले, पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली आम्ही उत्पादन वाढवण्याचे प्रयत्न केले आहेत. पण वाढत्या उत्पादनाबरोबरच मानवी आरोग्य आणि मातीच्या आरोग्याची सुरक्षितता याची देखील काळजी वेळोवेळा सरकारने घेतली आहे. आता देश अन्नधान्याच्याबाबतीत स्वयंपूर्ण झाला असून आम्हाला भूक आणि कुपोषण पूर्णपणे दूर करायचे आहे. पर्यावरणीय बदलाच्या धोक्यांना सामोरे जाताना वाढते तापमानाचा उत्पादनावर परिणाम होत आहे. यामुळे येणाऱ्या पिढ्यांच्या भवितव्यासाठी चिंता करायला हवी. आजपासून कृषी अर्थतज्ज्ञ त्यांच्या उपायांवर काम करण्यास सुरुवात करतील. तर कृषी शास्त्रज्ञांच्या या परिषदेतून निघणारे निष्कर्ष शेतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरतील, असाही आशावाद चौहान यांनी बोलून दाखवला.

Shivraj Singh Chouhan
Shivraj Singh Chauhan : केंद्रीय कृषीमंत्री होताच शिवराजसिंह यांनी घेतली अधिकाऱ्यांची बैठक

'वसुधैव कुटुंबकम' भारताची परंपरा असून संपूर्ण जग एक कुटुंब आहे. पंतप्रधानांची चिंता केवळ भारतासाठी नसून संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी आहे. त्यामुळे केवळ अन्नसुरक्षा बळकट करणे आमचे उद्दिष्ट नसून येणाऱ्या पिढ्यांसाठी पृथ्वी सुरक्षित करणे भारताची प्राथमिकता आहे. त्यासाठी कृषी विभाग कोणतीही कसर सोडणार नाही, अशी ग्वाही चौहान यांनी यावेळी दिली.

आजचा भारत आहे : मोदी

यावेळी पीएम मोदींनी उपस्थित कृषी अर्थतज्ज्ञांना संबोधित करताना, आमच्या परंपरा, अन्न आणि शेतीबद्दलचे अनुभव आपल्या देशाइतकेच प्राचीन आहेत. तर भारतातील कृषी परंपरेत विज्ञानाला प्राधान्य दिले जात असल्याचे मोदी म्हणाले. भारतामध्ये कृषी-संबंधित शिक्षण आणि संशोधन परिसंस्था मजबूत असून भारतीय कृषी संशोधन परिषदेकडे १०० हून अधिक संशोधन संस्था आहेत. भारतात कृषी आणि संबंधित विषयांचा अभ्यास करण्यासाठी ५०० हून अधिक महाविद्यालये असून ७०० हून अधिक कृषी विज्ञान केंद्रे आहेत. जी शेतकऱ्यांपर्यंत नवीन तंत्रज्ञान पोहोचवण्यास मदत करतात. ६५ वर्षांमागील भारत आणि आताचा भारत यात फरक असून आज भारत अन्नधान्यात स्वयंपूर्ण आहे. भारत दूध, डाळी आणि मसाल्यांचा सर्वात मोठा उत्पादक देश असल्याचे मोदी म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com