Abdul Sattar  agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Minister Abdul Sattar : कृषिमंत्री सत्तार यांनी केली नुकसानीची पाहणी

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी हताश न होता धीर धरावा, असे सांगून अधिकाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Team Agrowon

Jalna News : वडीगोद्री येथे गुरुवार (ता. १६) रोजी रात्री झालेल्या वादळी पावसामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी शनिवार (ता.१८) रोजी वडीगोद्री येथे पाहणी केली.

वडीगोद्री, अंतरवाली सराटी, नालेवाडी, आदी ठिकाणी गहु, हरभरा, ऊस, मोसंबी आदी पिकांचे नुकसान झाले. झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तातडीने प्रस्ताव सादर करावे, असे निर्देश मंत्री अब्दुल सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी हताश न होता धीर धरावा, असे सांगून अधिकाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.

झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच निर्णय घेतील, असे कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी जालना जिल्ह्यातील वडीगोद्री (ता. अंबड) येथील अवकाळी पाऊस व वादळीवारामुळे नुकसान झालेल्या गहू पिकाची पाहणी केली.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भीमराव रणदिवे, नायब तहसीलदार धनश्री बालचित, तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी ,सुरेश काळे, यांच्यासह महसूल, ग्रामविकास, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी व शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fodder Management: कमी पावसाच्या स्थितीत चाऱ्याचे आत्तापासून करा नियोजन

Gharkul Yojana : सोलापुरात ३ हजारांहून अधिक घरकुल लाभार्थींना ७२२२ ब्रास वाळूचे वाटप

Weed Removal Begins: भात, नाचणी पिकांत तण काढणी सुरू

Sugarcane Dues : जिल्ह्यात ३३७ कोटींची ऊसबिले अद्यापही थकीत

Ravikant Tupkar: रविकांत तुपकरांना पोलिसांची नोटीस; पण आंदोलनावर ठाम

SCROLL FOR NEXT