Dhananjay Munde Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Export : कृषिमंत्री मुंडेंनी घेतली वाणिज्यमंत्र्यांची भेट; केंद्र सरकार दोन लाख टन कांदा खरेदी करणार

Onion Rate : कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी कांदा निर्यातीबाबत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची दिल्ली येथे मंगळवारी (ता.२२) चर्चा केली.

Team Agrowon

Onion News : कांदा निर्यात शुल्काबाबत विचार करू, अशी भूमिका केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी घेतल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. तसेच केंद्र सरकार नाफेड मार्फत राज्यातील २ लाख टन कांदा प्रतिक्विंटल २ हजार ४१० रुपये दराने खरेदी करणार असल्याचे मुंडे म्हणाले.

केंद्र सरकारनं कांदा निर्यात शुल्कात ४० टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरले. परिणामी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी कांदा निर्यातीबाबत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची दिल्ली येथे मंगळवारी (ता.२२) चर्चा केली.

या चर्चेतून मात्र कांदा निर्यातशुल्काबाबत ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. मुंडे म्हणाले, "केंद्र सरकारनं कांदा ४० टक्के निर्यातशुल्क लावलं आहे. त्यामुळे कांदा बाजारात दर खाली पडू नयेत. शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून मंगळवारी (ता.२२) दुपारीपासून नाफेड आणि एनसीसीएफमार्फत खरेदी केली जाणार आहे." 

मुंडे पुढे म्हणाले, "

राज्यातील शेतकरी नेते आणि शेतकऱ्यांनी सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिव डॉ अजित नवले म्हणाले, "महाराष्ट्रात शेतकऱ्यांकडे ४० लाख मेट्रिक टन कांदा शिल्लक आहे. एकीकडे या कांद्यावर ४० टक्के निर्यातशुल्क लावायचं तर दुसरीकडे केवळ २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याची घोषणा करायची, हा या समस्येवरील उपाय नाही. सरकारनं ४० टक्के निर्यातशुल्क रद्द करावं. तरच सरकार कांदा खरेदी सारखे उपाय करावेत."

दरम्यान, केंद्र सरकारच्या कांदा ४० टक्के निर्यातशुल्काबाबत शेतकरी आक्रमक झाले आहेत. केंद्र सरकारनं कांदा निर्यात शुल्क रद्द करावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Mulching: उन्हाळी पिकांसाठी आच्छादन आवश्यक

ASER Report: शिक्षण व्यवस्थेवरील अविश्‍वासाची कथा!

Farmers Issue: कोकणचा ‘आक्रोश’

Gas Shortage Issue: शेतीमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांची उपासमार

Pune ZP Budget: पुणे ‘झेडपी’चा ३०१ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर

SCROLL FOR NEXT