Dhananjay Munde Agrowon
ॲग्रो विशेष

Dhananjay Munde : बियाणे आणि खते विक्रेत्यांच्या मनमानी कारभाराला ब्रेक? कृषीमंत्र्यांनी जारी केला हेल्पलाइन क्रमांक

Helpline number for seeds and fertilizers : राज्यात बोगस खते आणि बियाणांचा सुळसुळाट झाला आहे. तर विक्रेत्यांकडून देखील शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. यावरून कृषीमंत्र्यांनी हेल्पलाइन क्रमांक जारी करत कारवाईचा इशारा दिला आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्यात मॉन्सूनचे आगमन झाले असून येत्या काही दिवसात संपूर्ण राज्यात मॉन्सून बरसेल. त्यामुळे शेतकऱ्यांची खरीप हंगामाची लगबग सुरू झाली असून पेरण्यांना वेग आला आहे. दरम्यान राज्यात बोगस बियाणांचा सुळसुळाट तसेच विक्रेत्यांकडून मनमानी कारभार सुरू असल्याचे उघड झाले आहे. विक्रेते शेतकऱ्यांकडून जादा पैसे आकारत आहेत. यावरून कृषी विभाग सतर्क झाला असून कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी हेल्पलाइन क्रमांक जारी करत कारवाईचा इशारा दिला आहे.

राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये मॉन्सून पूर्व पाऊस होत आहे. तर ६ जून पासून राज्याच्या तळ कोकण आणि सातारा, कोल्हापूर सह सांगली जिल्ह्यात मॉन्सून सुरू झाला आहे. त्यामुळे खरीपाची लगबग सुरू झाली आहे. यावरून मुंडे यांनी राज्याच्या खरीप हंगामाचा आढावा घेतला. त्या आढाव्यात मुंडेंनी शेतकऱ्यांसाठी 'कृषी तक्रार व्हॉट्सॲप हेल्पलाइन क्रमांक' जारी करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार कृषी विभागाने ९८२२४४६६५५ हा व्हॉट्सॲप क्रमांक जारी केला.

या उपक्रमानुसार राज्यात कोठेही कृषी केंद्रे अथवा विक्रेते शेतकऱ्यांना बियाणे किंवा खते काळाबाजार करून विक्री करत असतील. अथवा शेतकऱ्यांना बियाणे किंवा खते काही कंपन्यांकडून खरेदी करण्यास भाग पाडत असतील. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना तक्रार करता येणार आहे.

शेतकऱ्यांना चढ्या दराबाबत तक्रार करता येणार असून दुकानाचे नाव, ठिकाण, तालुका, जिल्हा आणि इतर उपलब्ध पुरावे वरिल व्हॉट्सॲप क्रमांक देता येणार आहेत. त्या तक्रारींची तक्रारीची तत्काळ दखल घेतली जाईल असेही मुंडे यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच शेतकऱ्यांने केलेल्या तक्रारीची तत्काळ दखल घेऊन त्याची पडताळणी करून कारवाई केली जाईल. तसेच तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांची नावे पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल अशीही माहिती मुंडे यांनी दिली आहे.

व्हॉट्सॲप क्रमांक सुरू

कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी गेल्या वर्षीही हा अभिनव उपक्रम राबवला होता. यामुळे हजारो तक्रारींचे निराकरण होण्यास मदत झाली होती. त्यामुळे यावर्षी हा उपक्रम राबविण्याचा निर्णय मुंडे यांनी घेतला आहे.

जबाबदारी कृषी विभागाची

'कृषी तक्रार व्हॉट्सॲप हेल्पलाइन नंबर'वर प्राप्त झालेल्या बियाण्यांबाबतच्या तक्रारींची चौकशी करण्याची जबाबदारी कृषी विभागाची असेल. या उपक्रमाद्वारे करण्यात आलेल्या कारवाईमुळे राज्यातील बनावट बियाणे, बनावट खते आणि बनावट कीटकनाशकांना आळा बसणार असून, त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. तसेच आता राज्यातील बनावट बियाणे विक्री करणाऱ्यांवर या उपक्रमातून कारवाई करण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Melghat Water Scarcity : मेळघाटच्या पाणीटंचाईला ब्रेक

Nanded Water Stock : नांदेडमधील पाणीसाठा ३१ दलघमीने वाढला

Automated Weather Station : सांगलीत स्वयंचलित हवामान केंद्रासाठी ६९६ गावांत चाचपणी

Sangli DCC Bank : सांगली जिल्हा बँकेकडून ९४९ कोटींचा कर्जपुरवठा

Orchard Farming : सांगली जिल्ह्यात फळबागेचे क्षेत्र एक लाख एकर

SCROLL FOR NEXT