Farmers Issue Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Issue : प्रचार सभांत शेतीचे प्रश्‍न दुर्लक्षित

Maharashtra Election 2024 : विकासाचे विषय, जनतेच्या समस्या-प्रश्‍नांना बगल देऊन वैयक्तिक टीका- टिप्पणी करण्यावर भर दिल्याने मतदारांत नाराजी आहे.

Team Agrowon

Ahilyanagar News : विधानसभा निवडणुकीच्या मतदार संघात प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे. मात्र अहिल्यानगर जिल्ह्यात यंदाच्या प्रचारात मतदार संघातील विकासाचे मुद्दे यावर न बोलता ‘‘बोकड- शेळ्यांची मुंडके, सुपारी बाज उमेदवार, सेटलमेंट करणारे व दहशत दडपशाही करणारा,’’ असे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत. विकासाचे विषय, जनतेच्या समस्या-प्रश्‍नांना बगल देऊन वैयक्तिक टीका- टिप्पणी करण्यावर भर दिल्याने मतदारांत नाराजी आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात रस्त्यांची झालेली दुरवस्था, खंडित वीजपुरवठा, पाणी व साखर कारखान्यांकडून उसाला मिळत असलेल्या कमी भावामुळे त्रस्त आहे. याशिवाय एमआयडीसी, बेरोजगारांचा प्रश्‍न, अतिक्रमणाचा प्रश्‍न, गुंडगिरी अशा कितीतरी समस्यांनी जनता आणि शेतकरी त्रस्त आहेत.

सोशल मीडियावरही आपल्या नेत्याची विकासात्मक बाजू मांडण्याऐवजी विरोधकांवर जहरी शब्दांत व्यक्तिगत टीका करून ते ‘व्हायरल’ करण्याचे प्रकार सुरू आहे. या प्रश्‍नांच्या भोवती विधानसभेची निवडणुकीत प्रचार होणे अपेक्षित आहे.

आमचं मत तुम्हालाच

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच मतदार संघात पक्ष-अपक्ष उमेदवारांची संख्या मोठी आहे. त्यांच्या प्रचारार्थ कुटुंबीय, नातेवाईक, कार्यकर्ते आदींची फौजच मैदानात उतरलेली आहे. सकाळ-सायंकाळ ही फौज मतदारांच्या घरी पोहोचत आहे.

मतदार चलाख झाले आहेत. घरी आलेल्या पाहुण्यांना नाराज करायचे नाही म्हणून सर्वांनाच ते आमचे मत तुम्हालाच..असे आश्‍वासन देत आहेत. त्यामुळे आश्‍वासने देण्यात मतदार आता आपल्याही पुढे गेल्याची प्रचिती उमेदवार नेते मंडळींना येऊ लागली आहे.

अहिल्यानगरमधील शेतीचे प्रश्‍न

साखर कारखान्यांनी यंदाही ऊसदराचा प्रश्‍न कायम ठेवला. एकाही कारखानदाराकडून दर जाहीर नाही.

मागील दोन वर्षात अनेक शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही. त्याबाबत कोणताही नेता बोलत नाही.

नगर, श्रीगोंदा तालुक्यांतील दुष्काळी गावांसाठी साकळाई सिंचन पाणी उपसा योजना, डिंभे बोगदा योजनेचे भिजत घोंगडे कायम

शेवगाव तालुक्यातील ताजनापूर उपसा सिंचन योजनेला दुर्लक्ष कायम. विजेचा प्रश्‍न कायम असताना त्याकडे दुर्लक्ष.

ग्रामीण भागात रस्ते, पिण्याच्या पाण्यासाठीच्या जलजीवन योजना अपूर्णच.

संगमनेर, अकोले, राहातासह अन्य भागांसाठी महत्त्वाच्या असलेल्या निळवंडेच्या चाऱ्यांचा प्रश्‍न, पाथर्डीसाठी असलेल्या मुळा चारीच्या शेवटपर्यंत पाणी जात नसल्याचा प्रश्‍न कायम. जामखेड, कर्जत, पारनेरला मिळणाऱ्या पाण्याचा प्रश्‍न कायम.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Politics : जिल्हा बँक, सहकारी साखर कारखाने कोल्हापूर जिल्ह्याचे सत्ता केंद्र; ६ आमदार साखर कारखानदार

Maharashtra Cabinet : पश्चिम विदर्भात अकोला, बुलडाण्याला मंत्रिपदाची आस

Vijay Wadettiwar : महायुती जिंकली अभिनंदन! पण, नवे सरकार शेतकऱ्यांसाठी काय करते? यावर आमचे लक्ष असेल; वडेट्टीवार यांचा इशारा

Sweet Sorghum Ethanol : गोड ज्वारीच्या इथेनॉल खरेदी दराला केंद्र सरकारचा खोडा?

Onion Market : हंगाम बदल, कांदा चाळ अर्थकारणाला चालना मिळेना

SCROLL FOR NEXT