Agriculture Squad agriculture
ॲग्रो विशेष

Agriculture Squad : कोल्हापुरात ‘कृषी’चे भरारी पथक, तक्रार निवारण कक्ष स्थापन

Kolhapur Farmers : कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी बंधू व महिला शेतकरी यांना बियाणे, खते व कीटकनाशके यांच्या खरेदी-विक्रीबाबत तक्रारी असल्यास, त्या तक्रारींचे निराकरण या कक्षामार्फत केले जाणार आहे.

Team Agrowon

Kolhapur Agriculture News : शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात कृषी विभागाकडून तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. जिल्ह्यातील शेतकरी बंधू व महिला शेतकरी यांना बियाणे, खते व कीटकनाशके यांच्या खरेदी-विक्रीबाबत तक्रारी असल्यास, त्या तक्रारींचे निराकरण या कक्षामार्फत केले जाणार असून शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केले.

खरीप हंगाम सुरू होत असताना शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि कीटकनाशके यांसारख्या आवश्यक निविष्ठांच्या खरेदीसाठी वितरकांकडून जादा दर आकारणी केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच, माल उपलब्ध असतानाही कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे प्रकार घडू शकतात. यामुळे शेतकऱ्यांवर अनावश्यक आर्थिक बोजा येण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांनी जादा दराने निविष्ठा विक्री, मालाची कृत्रिम टंचाई, निकृष्ट दर्जाचे बियाणे, खते किंवा कीटकनाशके याबाबत तक्रारी नोंदवाव्यात. तक्रारींची प्रभावी हाताळणी करण्यासाठी आणि निविष्ठा विक्री केंद्रांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात तालुका स्तरावर १२ आणि जिल्हा स्तरावर १ अशा एकूण १३ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे.

ही पथके नियमितपणे बियाणे, खते, कीटकनाशके विक्री करणाऱ्या दुकांनांची तपासणी करत असून, जादा दराने विक्री, बोगस मालाची साठवणूक, तसेच ग्राह्य न पडणाऱ्या कागदपत्रांची तपासणी करत आहेत. गुणवत्तेचे प्रमाणपत्र, विक्री पावत्या आणि साठा नोंदी यांचीही काटेकोर तपासणी या पथकांद्वारे केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक व आर्थिक शोषण रोखण्यास मदत होणार असून, दोषी वितरकांवर तातडीने कारवाई करण्यात येईल.

या भरारी पथकांमध्ये तालुकास्तरावरील कृषी अधिकारी आणि जिल्हास्तरावरील गुणवत्ता निरीक्षक सहभागी असून, तपासणीत कोणताही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पांगरे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Waiver GR: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ चा शासन निर्णय जारी; शेतकऱ्यांची दोन लाखांपर्यंत कर्जमाफी

Farm Loan Waiver GR: कर्ज २ लाखांपेक्षा जास्त असेल तर माफ होणार का?; 'एकवेळ समझोता' योजना काय आहे?

Ujani Dam Water: पाऊस लांबण्याची शक्यता; उजनीतील पाणी केवळ पिण्यासाठीच राखीव

Banana Cultivation: केळीच्या दर्जेदार उत्पादनासाठी जमिनीची सुपीकता टिकवणे गरजेचे : शरद विसपुते

Kharif Tayari: दिंडोरी तालुक्यात कृषी विभागाकडून खरिपाची तयारी

SCROLL FOR NEXT