Agriculture Exhibition Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Exhibition : नवनवीन प्रयोगासाठी कृषी प्रदर्शन उपयुक्त ठरेल

Chief Minister Eknath Shinde : पारंपरिक शेतीबरोबर नवनवीन, अत्याधुनिक शेतीतून उत्पादन घेतल्यास बळिराजा समृद्ध होईल. शेतकऱ्यांनी त्याच मेहनतीत दुप्पट उत्पादन देणाऱ्या प्रजातींची लागवड करावी.

Team Agrowon

Pandharpur News : पारंपरिक शेतीबरोबर नवनवीन, अत्याधुनिक शेतीतून उत्पादन घेतल्यास बळिराजा समृद्ध होईल. शेतकऱ्यांनी त्याच मेहनतीत दुप्पट उत्पादन देणाऱ्या प्रजातींची लागवड करावी.

अशा नवनवीन प्रयोगांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी (ता. २९) येथे व्यक्त केला.

कृषी विभागाच्यावतीने आयोजित कृषी पंढरी प्रदर्शन व तृणधान्य महोत्सव २०२३ कार्यक्रमात ते बोलत होते.

पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात आयोजित या कार्यक्रमास वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार भरत गोगावले, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, आत्माचे प्रकल्प संचालक मदन मुकणे आदी उपस्थित होते.

शासकीय महापूजेवेळी आपण विठुरायाला बळिराजाच्या समृद्धीसाठी साकडे घातले असल्याचे सांगून श्री. शिंदे म्हणाले, बळिराजाच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. शेती आणि शेतकऱ्यांसाठी जलयुक्त शिवार २.०, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, केवळ एक रुपयात पीकविमा, उत्पन्नवाढीसाठी महाकृषी विकास अभियान आदी योजना सुरू केल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solar Energy Project: सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार: अध्यक्ष मानसिंगराव नाईक

Animal Feed : चारा-पाण्याचा प्रश्न खानदेशात सुटण्याचे संकेत

Cotton Crop Disease: लाखेगाव, अलीपुरातील कपाशी पिकावर ‘मर’ रोगाचा फटका

Kharif Sowing 2025: तीन जिल्ह्यांत २० लाख ४८ हजार हेक्टरवर पेरणी

Book Review: कृषी अर्थव्यवस्थेच्या तळापर्यंत जाताना...

SCROLL FOR NEXT