fertilizer  Agrowon
ॲग्रो विशेष

Fertilizer seller : सहा खत विक्रेत्यांवर कृषी विभागाची कारवाई

fertilizer Update : शेतकऱ्यांची अडवणूक होऊ नये, त्यांना खते आणि बियाणे योग्य किमतीत मिळावीत यासाठी जिल्ह्यात कृषी विक्रत्यांची तपासणी करण्यासाठी भरारी पथके तयार करण्यात आली आहेत.

Team Agrowon

Satara News : सातारा जिल्ह्यात खरीप हंगामात खते व बियाणे विक्री केंद्रांवर नजर ठेवण्यासाठी जिल्ह्यात एकूण १२ भरारी पथकांची स्थापना करण्यात असून या भरारी पथकांमार्फत सहा खत विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी दिली.

शेतकऱ्यांची अडवणूक होऊ नये, त्यांना खते आणि बियाणे योग्य किमतीत मिळावीत यासाठी जिल्ह्यात कृषी विक्रत्यांची तपासणी करण्यासाठी भरारी पथके तयार करण्यात आली आहेत.

युरिया खताच्या विक्रीत अनियमितता केल्याचे निर्दशनास आल्याने तसेच जादा दराने खताची विक्री केल्याने आणि खताची विक्री करताना पॉस मशिनचा वापर न करणे, पॉस मशिनवरील साठा, नोंदवहीतील साठा न जुळणे, शेतकऱ्यांना योग्य प्रकारे बिले न देणे, परवाना नूतनीकरण न करणे यामुळे जिल्ह्यातील सहा खत विक्रेते यांच्यावर कारवाई करण्यात आली.

या तपासणीत दोषी आढळलेल्या ४ विक्री केंद्रावर परवाना निलंबनाची कारवाई आणि २ खत विक्री केंद्राचा परवाना रद्दची कारवाई केली. यामध्ये वाई तालुक्यातील ३, सातारा तालुक्यातील १ आणि पाटण तालुक्यातील २ खत विक्रेत्यांचा समावेश आहे.

जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली भरारी पथके खते, बियाणे व कीटकनाशके दुकानांची अचानक तपासणी करतील तर प्रत्येक तालुक्यात तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत.

या भरारी पथकामध्ये कृषी विभाग व जिल्हा परिषद कृषी विभाग, वजन-मापे निरिक्षक यांचे प्रतिनिधी आहेत असेही फरांदे यांनी सांगितले. पंचायत समिती स्तरावर व तालुका कृषी अधिकारी कार्यालयात निविष्ठांबाबत तक्रार असल्यास, ती नोंदविण्यासाठी तक्रार नोंदवही ठेवण्यात आली आहे.

येथे करा तक्रार...

सातारा जिल्ह्यामध्ये कृषी निविष्ठांबाबत कोणतीही तक्रार असल्यास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षाशी सकाळी ८ ते सायं ७ वाजेपर्यंत ७४९८९२१२८४ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन श्रीमती फरांदे यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ujani Floating Solar Project: उजनी जलाशयावर केवळ नऊ टक्के क्षेत्रावरच ‘फ्लोटिंग सोलार’ प्रकल्प; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे स्पष्टीकरण

Wild Boar Attack: शेतशिवारात रानडुकरांचा हैदोस; कपाशी पिकाचे नुकसान

Drought Management: बांधबंदिस्ती, जलसंधारण, पीक नियोजनानेच दुष्काळावर मात शक्य; पोपटराव पवार

Ahilyanagar District Bank Election: अहिल्यानगरला जिल्हा बॅंकेच्या दहा जागांसाठी उद्या मतदान; एकूण सत्तावीस उमेदवार; मंगळवारी मतमोजणी

Maize Trading: चांदूरबाजारमध्ये मक्याची उलाढाल वाढली

SCROLL FOR NEXT