Agriculture  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture News : महाडमध्ये शेती पडीक

Paddy Agriculture : आधुनिक शेतीबाबत उदासीनता, जमीन विक्री करून मिळणारा पैसा, शहरांत होणारे स्थलांतर, तरुणांची शेतीकडे पाठ आदी कारणांमुळे महाड तालुक्यात भातशेती अडचणीत आली आहे.

Team Agrowon

Mumbai News : आधुनिक शेतीबाबत उदासीनता, जमीन विक्री करून मिळणारा पैसा, शहरांत होणारे स्थलांतर, तरुणांची शेतीकडे पाठ आदी कारणांमुळे महाड तालुक्यात भातशेती अडचणीत आली आहे. पडीक भात क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. जास्‍त वेळ शेती पडीक राहिल्‍यास नापीक होण्याचा धोका वाढला आहे.

गतवर्षी तालुक्यात १२ हजार ८०० हेक्टरवर भात लागवड केली गेली. तीन हजार ४०० हेक्टरमध्ये हरभरा, मूग, मटकी, पावटा, चवळी तसेच भाजीपालाचे उत्पादन घेतले जात आहे. मात्र काही वर्षांपासून तालुक्यातील भात पीक क्षेत्र घटत आहे. दहा वर्षांपूर्वी १९ हजार २०० हेक्टर असणारे क्षेत्र गतवर्षी १२ हजार ८०० हेक्टर तर यंदा केवळ १० हजार हेक्टरवर राहिले आहे.

तालुक्यात सुमारे दोन हजार हेक्टर क्षेत्र आजही पडीक स्थितीत आहे. तालुक्यातील शेत जमिनींची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. नवी मुंबई व परिसरात भूसंपादनातून मिळालेल्या रकमेमुळे या भागात जमीन विक्री व्यवहार वाढले आहेत. तालुक्यात या पूर्वी कोकण रेल्वे, धरणे, एमआयडीसी यासाठी जमिनी देण्यात आल्या, आता मुंबई-गोवा महामार्गासाठी संपादित जमिनीमुळे लागवडीखालील क्षेत्र घटले असले तरीही पैसा मिळाल्याने उर्वरित शेतीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे.

उत्‍पादन कमी, खर्च अधिक

शेतीसाठी मजूर नसल्याने शेती करणे अवघड होत आहे. यासाठी यांत्रिकी व आधुनिक शेतीकडे वळणे गरजेचे आहे. आधुनिक शेतीला बगल देत पारंपरिक शेतीलाच प्राधान्य दिले जात असल्याने भात पीक घेताना उत्पादन कमी आणि खर्च अधिक अशी शेतकऱ्यांची अवस्‍था झाली आहे. यामुळे अधिकाधिक भात शेती पडीक झाली आहे. पारंपरिक शेतीमध्ये बदल करून आधुनिक तंत्रज्ञान व बियाणे अवलंबल्यास उत्‍पादन वाढू शकते. नांगरणीपासून मळणीपर्यंत अनेक आधुनिक उपकरणे शेती विभागात सवलतींच्या दरात उपलब्ध झाली आहेत.

येत्या काळात शेती हाच प्रमुख व्यवसाय होणार आहे. शेतीला पर्याय नसल्याने तिचे महत्त्व समजून तरुणांनी एकत्र येत सामूहिक शेतीवर भर दिला पाहिजे. नोकरी व्यवसायापेक्षा जास्‍त नफा शेतीत आहे. फक्‍त मेहनतीची आणि आधुनिक तंत्रज्ञानाची अभ्‍यास करून योग्‍य पीक घेणे गरजेचे आहे. तसेच पडीक शेतजमीन लागवडीखाली आणली पाहिजे.- दीपक आंब्राळे, शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement : सोयाबीन खरेदी १२ टक्के ओलाव्याच्या अटीनेच सुरू

Natural Farming : नैसर्गिक शेती राष्ट्रीय अभियानास मंजुरी

Sugarcane Crushing : सोलापुरातील ९ कारखान्यांत ३ लाख ४४ हजार टन गाळप

Sugarcane Harvesting Workers : ऊसतोडणी मजूर कारखान्यावर आल्याने परिसर गजबजला

Maharashtra Weather : राज्यात हुडहुडी वाढली

SCROLL FOR NEXT