Agriculture Technology Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture University : कृषी विद्यापीठांची निर्मिती शेतकरी हितासाठीच

Dr. Indra Mani : शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये उन्नती व्हावी, यासाठीच महाराष्ट्रामध्ये कृषी विद्यापीठांची निर्मिती केली आहे, शेतकऱ्यांनी विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा, ज्ञानाचा पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे.

Team Agrowon

Solapur News : शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये उन्नती व्हावी, यासाठीच महाराष्ट्रामध्ये कृषी विद्यापीठांची निर्मिती केली आहे, शेतकऱ्यांनी विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा, ज्ञानाचा पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे.

आज पाणी फाउंडेशनच्या मार्गदर्शनानुसार करमाळा तालुक्यातील शेतकरी गटांनी तंत्रज्ञानाचा वापर करून तुरीचे उच्चांकी उत्पादन घेतले, हे कौतुकास्पद आहे, असे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी मिश्रा यांनी केले.

सरपडोह (ता. करमाळा) येथे कृषी संशोधन केंद्र, बदनापूर, आत्मा करमाळा व जिद्द शेतकरी गट, जिजाऊंच्या लेकी शेतकरी गटाच्या वतीने आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर पाणी फाउंडेशनचे सीईओ सत्यजित भटकळ, कृषी अधिकारी डी. एल. मोहिते, तालुका कृषी अधिकारी देवराव चव्हाण, कृषी संशोधन केंद्र बदनापूरचे डॉ.दीपक पाटील, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. किरण जाधव वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ज्ञानदेव मुटकुळे, वरिष्ठ कीटकशास्त्रज्ञ डॉ. विष्णू गित्ते, डॉ. प्रशांत सोनटक्के रोगशास्त्रज्ञ् तसेच महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाचे डॉ. नंदकुमार कुटे, डॉ. अनिल दुर्गुडे उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. मिश्रा म्हणाले, की पाणी फाउंडेशन केवळ सामाजिक बांधिलकीतून वॉटर कप, फार्मर कप या माध्यमातून काम करत आहेत. खरं तर विद्यापीठ आणि महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे कामच पाणी फाउंडेशन पुढे घेऊन जात आहे. अतिशय आत्मीयतेने आणि तळमळीने हे काम केले जात असल्यामुळे पाणी फाउंडेशनची चळवळ ही लोकचळवळ झाली आहे, त्याबद्दल मी समाधानी असल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली.

प्रारंभी फिसरे व सरपडोह येथील तूर पिकांच्या प्लॉटची पाहणी कुलगुरू मिश्रा व शास्त्रज्ञांनी केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाणी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक सत्यवान देशमुख यांनी केले. पाणी फाउंडेशनचे सीईओ सत्यजित भटकळ, तालुका कृषी अधिकारी देवराव चव्हाण, कृषी अधिकारी डी. एल. मोहिते यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी महेंद्र देशमुख, जयश्री कुलकर्णी, गणेश देवकर, हनुमंत रोकडे, अरुण चौगुले, हिराजी राऊत डॉ.विकास वीर या शेतकऱ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका समन्वयक आशिष लाड यांनी केले, आभार आत्माचे अजयकुमार बागल यांनी मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Compensation: कृषिमंत्री भरणे पोहचले शेतकऱ्यांच्या बांधावर; नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची दिली ग्वाही

Marathwada Rain: तीन जिल्ह्यांतील १९८ मंडलांत पावसाची हजेरी

Nanded Heavy Rain: मुखेडला पाच नागरिकांसह ५२ जनांवरांचा मृत्यू

Agriculture Technology: विदर्भातील दुर्गम भागात कृषी तंत्रज्ञान विस्तारासाठी प्रयत्न

Agriculture Technology: भात रोप निर्मितीचे नवे तंत्र ठरतेय फायद्याचे...

SCROLL FOR NEXT