Krishi Seva Kendra Agrowon
ॲग्रो विशेष

Bogus Seed Act : कृषी सेवा केंद्रधारक तीन दिवस बंद पाळणार

Krushi Seva Kendra : बोगस बियाणे आणि खत कायद्याच्या निषेधार्थ राज्यातील कृषी सेवा केंद्र २ ते ४ नोव्हेंबर असे सलग तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Team Agrowon

Nagpur News : बोगस, अवैध निविष्ठा विक्री प्रकरणात कृषी विक्रेत्यांनाही दोषी ठरवीत त्यांच्याविरोधात नव्या कायद्याअंतर्गत कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. मात्र ही बाब अन्यायकारक असल्याचा आरोप करीत याविरोधात राज्यातील कृषी सेवा केंद्र २ ते ४ नोव्हेंबर असे सलग तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय ‘माफदा’कडून घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र फर्टीलायझर्स, पेस्टीसाईड, सीड्स डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष विनोद तराळ पाटील, महासचिव बिपीन झुंबरलाल कासलीवाल, कोशाध्यक्ष प्रकाश नवलखा, उपाध्यक्ष संजय बोरा, संचालक राजेंद्र मामनिया, दिलीप गांधी, सतीश मनोत, किशन चोपडे, मनीषा खामकर यांनी या संदर्भाने बुधवारी (ता. २५) कृषी आयुक्‍तालयात निवेदन दिले.

निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक विकास पाटल, गुण नियंत्रण अधिकारी प्रवीण देशमुख यांना हे निवेदन देण्यात आले. त्यानुसार प्रस्तावित विधेयक ४० ते ४४ अंतर्गत कायद्यातील जाचक नियम व अटी कृषी निविष्ठा विक्रेत्यांवर लादण्याचे प्रस्तावित आहे.

हे प्रस्तावीत कायदे मागे घेण्याची मागणी आहे. परंतु सरकारकडून त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने पहिल्या टप्प्यात २ ते ४ नोव्हेंबर या कालावधीत राज्यातील सर्व कृषी सेवा केंद्र बंद ठेवण्यात येतील. याची दखल न घेतल्यास बेमुदत व्यवसाय बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain: राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

Farmer Struggle: दराअभावी घेवडा उत्पादक अडचणीत

Farmer Issue: नांदेडमध्ये शेतकरी आत्महत्यांत वाढ

Soyeban Crop Damage : सोयाबीन ‘पाण्यात’

Pesticide Buying Guide: किडनाशक खरेदीपूर्वी लक्षात ठेवायच्या महत्त्वाच्या बाबी

SCROLL FOR NEXT