Agriculture Input Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Input Center Strike : परभणी जिल्ह्यात गुरुवार ते शनिवार कृषी निविष्ठा विक्री केंद्र बंद

Latest Agriculture News : कृषी निविष्ठा विक्री करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी सध्या प्रचलित असलेले कायदे पुरेसे आहे.

Team Agrowon

Parbhani News : महाराष्ट्र शासनाकडील प्रस्तावित विधेयका मधील जाचक नियमा विरुध्द तसेच प्रस्तावित पाचही कायदे रद्द करावे या मागण्यांसाठी गुरुवार (ता. २) ते शनिवार (ता. ४) या कालावधीत पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बंद मध्ये परभणी जिल्ह्यातील सर्व कृषी निविष्ठा विक्रेते सहभागी होणार असून विक्री केंद्रे बंद ठेवण्यात येणार आहेत, अशी

माहिती परभणी जिल्हा बियाणे, खते व कीटकनाशके अधिकृत विक्रेता महासंघातर्फे देण्यात आली. कृषी निविष्ठा विक्री करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी सध्या प्रचलित असलेले कायदे पुरेसे आहे. मात्र राज्य शासनाकडून पुन्हा नवीन कायदे तयार करण्याची प्रक्रिया सुरु आहे. प्रस्तावित कायद्यातील तरतुदी विक्रेत्यासाठी अत्यंत जाचक आहेत.

त्यामुळे कृषी निविष्ठा विक्रीचा व्यवसाय करणे अशक्यप्राय होणार आहे. राज्यातील विक्रेते हे कोणत्याही कृषी निविष्ठांचे उत्पादन करीत नाहीत. कृषी विभागाकडून मान्यताप्राप्त उत्पादक कंपन्यांच्या कृषी निविष्ठा ह्या सीलबंद पॅकिंगमध्ये खरेदी करून शेतकऱ्यांना सीलबंद पॅकिंगमध्ये विक्री करतात.

कृषी विभागाकडून मान्यताप्राप्त सीलबंद व पॅकमधील निविष्ठांच्या दर्जाबाबत कृषी विक्रेत्यांना दोषी समजण्यात येऊ नये. योग्य निविष्ठा विकणाऱ्या कृषी निविष्ठा विक्रेत्यांवर जरब बसविण्यासाठी अन्यायकारक कायदे विक्रेत्यावर लादू नयेत अशी राज्यातील सर्व कृषी निविष्ठा विक्रेत्यांची मागणी आहे.

त्या मागणीला परभणी जिल्ह्यातील सर्व कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा पाठिंबा म्हणून सर्व कृषी केंद्रे बंद ठेवत आहोतया संदर्भात परभणी जिल्हा बियाणे, खते व कीटकनाशके अधिकृत विक्रेता महासंघाचे अध्यक्ष रमेश देशमुख, सचिव बाळासाहेब चोपडे आदीनी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Rate In Maharashtra : कांदा निर्यात धोरणामुळेच दर घसरले असे म्हणता येणार नाही; लोकसभेत केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

Opposition MPs Protest: विरोधी खासदारांची काळे कपडे घालून संसद परिसरात निदर्शने, लोकसभा, राज्यसभेचे कामकाज तहकूब

El Nino Update : एल निनो मार्च २०२७ पर्यंत टिकण्याची ९७ टक्के शक्यता; अमेरिकेच्या हवामान संस्थेचा अंदाज

Rainwater Harvesting: पर्जन्यजल संधारण : महत्त्व, नियोजन अन् प्रभावी व्यवस्थापन

Smart Mango Farming: ९० एकरांतील व्यवस्थापन तंत्रज्ञानामुळे झाले सुलभ

SCROLL FOR NEXT