Agriculture Department Agrowon
ॲग्रो विशेष

Agri Assistant Strike : संप कालावधी नियमित करण्याची कृषिमंत्र्यांकडे मागणी

Agriculture Department : महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेने आपल्या प्रलंबित असलेल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी १५ ते २७ मे २०२५ दरम्यान राज्यभर कामबंद आंदोलन केले होते.

Team Agrowon

Akola News : महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेने आपल्या प्रलंबित असलेल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी १५ ते २७ मे २०२५ दरम्यान राज्यभर कामबंद आंदोलन केले होते. या आंदोलनाची राज्य सरकारने दखल घेत कृषी सहायकांच्या काही मुख्य मागण्यांची सोडवणूकही केली आहे.

तर उर्वरित मागण्या लवकरच सोडवल्या जातील, असे आश्‍वासन कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी दिले आहे. दरम्यान, हा संपकाळ नियमित मानण्यात यावा, अशी मागणी कृषी सहायक संघटनेने कृषिमंत्र्यांकडे केली आहे.

या पार्श्‍वभूमीवर कृषी सहायक संघटनेचे सरचिटणीस महेंद्र गजभिये यांनी निवेदन पाठवत आंदोलनादरम्यानचा संपकाळ नियमित मानण्यात यावा, अशी विनंती केली आहे. मंत्र्यांच्या आवाहनानुसार संघटनेने तत्काळ आंदोलन मागे घेतले असून सर्व सदस्य कामावर रुजू झाले आहेत.

तसेच प्रलंबित राहिलेले काम अतिरिक्त वेळेत पूर्ण करण्याची ग्वाहीही संघटनेने दिली आहे. संघटनेने सरकारच्या सकारात्मक भूमिकेचे स्वागत केले असून, आंदोलनाची गांभीर्याने दखल घेतल्याबद्दल कृषिमंत्र्यांचे आभारही मानले आहेत. आंदोलनाचा कालावधी नियमित करून कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे.=

संघटनेतील कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय हक्कांसाठी हे आंदोलन केले. या काळात प्रलंबित असलेले काम पूर्ण केले जात आहे. काही ठिकाणी अधिकारी या संप काळातील वेतन देऊ नये अशी पत्रे काढू लागले आहेत. तरी कृषिमंत्र्यांनी या विषयात तातडीने लक्ष द्यावे व संबंधितांना आदेश देऊन हा संपकाळ नियमित करावा, अशी मागणी मागणी आहे.
-विलास रिंढे, अध्यक्ष, कृषी सहायक संघटना महाराष्ट्र

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tenant Farmers: भाडेपट्ट्याने शेतजमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांनाही मिळणार पीक कर्ज, पीक विम्याचा लाभ, सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Amaravati Water Crisis: अमरावती जिल्ह्यात लागताहेत २० टँकर

Water Scarcity: सोलापूर जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा; एक टँकर सुरू

MIDC Project: ‘एमआयडीसी’विरोधात आरपारच्या लढाईचे संकेत

Halad Nuksan: वादळी पावसामुळे हळदीचे नुकसान

SCROLL FOR NEXT