Agri Assistant Strike : संप लांबला तरच दिसेल तीव्रता

Agriculture Crisis : खरीप हंगाम तोंडावर असताना कृषी सहायकांनी आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी संप पुकारला आहे. पहिल्या टप्प्यात शेतकरीस्तरावर याचा फारसा परिणाम दिसून येत नसल्याचे चित्र विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात आहे.
Agriculture Department
Agriculture DepartmentAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : डिजिटायझेशनमुळे कृषी विभागाशी संबंधित अनेक सेवा ऑनलाइन झाल्या आहेत. योजनांच्या लाभासाठी ऑनलाइन प्रक्रिया करावी लागते. त्यातच संपाला देखील तीन दिवसच झाल्याने अद्याप आमच्या स्तरावर संपाचा फारसा परिणाम दिसून येत नसल्याची प्रतिक्रिया खैरगाव देशमुख (ता. पांढरकवडा, यवतमाळ) येथील प्रयोगशील शेतकरी प्रकाश पुप्पलवार यांनी दिली.

खरीप हंगाम तोंडावर असताना कृषी सहायकांनी आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी संप पुकारला आहे. पहिल्या टप्प्यात शेतकरीस्तरावर याचा फारसा परिणाम दिसून येत नसल्याचे चित्र विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात आहे. सद्या शेतकऱ्यांकडून बी-बियाणे खरेदीसाठी पैशाची जुळवाजुळव सुरू आहे. विदर्भात सुमारे १८ लाख हेक्‍टरवर कपाशीची लागवड होते.

Agriculture Department
Agriculture Assistant Protest: कृषी सहायक्कांच्या बंदमुळे योजनांची कामे ठप्प

विक्रेत्याकडून शेतकरीस्तरावर बियाणे विक्री सुरु झाली असली तरी गेल्या काही वर्षात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव व इतर कारणांमुळे कपाशीची घटलेली उत्पादकता, कमी दर यामुळे यंदा कपाशीखालील क्षेत्र कमी होण्याची शक्‍यता आहे. त्याचा परिणाम बियाणे उलाढालीवर देखील दिसून येत असून बाजारात गर्दीच नाही. त्यातच शासनाकडून अनुदानावर बियाणे वितरण होते. त्याकरिता परमीट वितरण पूर्वी कृषी सायकल मार्फत केले जाते. संपामुळे कृषी विभागाच्या कार्यालयातून परमिट वितरण होईल अशी शक्यता आहे.

परंतु या संदर्भाने अद्याप कोणतेच आदेश नाहीत त्यामुळे अनिश्‍चितता आहे. त्यातच संपाला तीनच दिवस झाल्याने तूर्तास त्याचा अपेक्षित परिणाम नाही, असे श्री. पुप्पलवार सांगतात. संप पुढे लांबल्यास मात्र परिणाम दिसून येतील, असेही ते म्हणाले. सध्या अवकाळी पाऊस बरसत असल्याने त्यामुळे होणाऱ्या नुकसानीचे सर्व्हेक्षण, पंचनामे करण्यासाठी असलेल्या पथकात कृषी सहाय्यकाचा समावेश राहतो.

Agriculture Department
Agricultural Assistants Strike: कृषी सहाय्यकांच्या संपामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ

खरिपात मार्गदर्शन त्यांच्याद्वारे केले जाते. बीज प्रक्रियेला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी सहायक गावागावात, बांधावर जातात, हे सारे काम प्रभावित होणार असल्याची प्रतिक्रिया धारमोडी (ता. पांढरकवडा, यवतमाळ) येथील दिलीप शेंडे यांनी दिली. संप लांबल्यास मात्र त्याचा परिणाम दिसून येणार असल्याचा दावा केला जात आहे.

केंद्रीय मंत्र्याच्या कार्यक्रमावर परिणाम नाही

केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान हे रविवारी (ता.१८) नागपूर दौऱ्यावर आहेत. या कार्यक्रमात विदर्भातील बहुतांश शेतकरी उपस्थित राहणार आहेत. या शेतकऱ्यांशी वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत संपर्क साधत उपस्थितीचे आवाहन करण्यात आले. त्यामुळे संपाच्या परिणामी शेतकरी उपस्थिती प्रभावित होणार नाही, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

गावातील सरपंचाच्या घरी जात त्याने शिफारस केलेल्या व्यक्तींना योजनांचा लाभ देणे एवढेच कृषी सहायकांचे काम मर्यादित असल्याचा माझा अनुभव आहे. सामान्य शेतकऱ्यांपर्यंत कृषी सहायक किंवा कृषी विभाग पोहोचला असता तर शिफारशीत तंत्रज्ञानाचा अवलंब मोठ्या प्रमाणावर झाला असता परंतु तसे झाले नाही. गावातील अनेक शेतकऱ्यांना आपल्याशी संबंधित कृषी सहायकाचे नावही माहीत नाही. त्यामुळे या संपाचा काही विशेष परिणाम होणार नाही.
- मनीष जाधव, शेतकरी, वागद, महागाव यवतमाळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com