Agriculture Advisory Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Advisory : कृषी सल्ला (राहुरी विभाग)

Agriculture Weather : प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार रविवार (ता. १७) पर्यंत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. उन्हाळा वाढत आहे. मातीतील ओलावा वाचविण्यासाठी आच्छादनाचा वापर करावा. त्यासाठी गवत, पिकांचे उर्वरित अवशेष किंवा पॉलिथिन पेपरचा वापर करता येईल.

Team Agrowon

Rahuri Agriculture Advisory:

उन्हाळी भुईमूग

आऱ्या लागणे.

पेरणीनंतर ४५ व ५५ दिवसांनी २०० लिटर पाण्याचा मोकळा ड्रम पिकावरून दोनदा फिरवावा. म्हणजे पिकाच्या सगळ्या आऱ्या जमिनीत घुसण्यास मदत होते. त्यांना शेंगा लागून उत्पादनामध्ये वाढ होते.

गहू

पक्वतेची अवस्था ते कापणी.

गहू पीक सध्या पक्वतेची किंवा काढणीच्या अवस्थेत आहे. पीक तयार होताच वेळेवर कापणी करावी. गव्हाच्या काही जातींचे (उदा. एनआय.५४३९, फुले त्र्यंबक) दाणे पीक पक्‍व झाल्यानंतर शेतात झडून मोठे नुकसान होते. ते टाळण्यासाठी अशा जातींचे पीक पक्‍व होण्याच्या २ ते ३ दिवस आधीच गव्हाची कापणी करावी.

गव्हाची काढणी शक्यतो सकाळी करावी. त्यामुळे शेतात दाणे गळण्याचे प्रमाण कमी राहते. कापणीवेळी दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण १५ टक्‍के असावे. गव्हाची मळणी यंत्राच्या साह्याने करावी. मळणी करताना गव्हाचे दाणे फुटणार नाहीत, याची काळजी घ्यावी. अलीकडे पीक कापणी, मळणी आणि धान्य पोत्यात भरण्याचे काम एकाच वेळी कम्बाइन हार्वेस्टरच्या साह्याने केले जाते. त्यामुळे वेगाने काम होते. शक्य असल्यास त्याचा वापर करावा.

काढणी केलेली पिके

साठवणूक

रब्बीची अनेक पिकांचा सध्या काढणी झाली असेल, त्यातील पुढील हंगामासाठी आवश्यक बियाणे आधीच वेगळे करून घ्यावे. अन्य धान्य वेगळे करून त्यात योग्य प्रमाणातच ओल राहील, इतके वाळवून घ्यावे. सामान्यतः कापणी केलेल्या पिकांच्या धान्यामध्ये ११ ते १२ टक्के, कडधान्ये ९ टक्के, तेलबिया ८ टक्के आणि भाजीपाला बियाणे यात ५ ते ६ टक्के इतका ओलावा राहील, अशा पद्धतीने बियाणे वाळवावेत. त्यामध्ये धान्यांचे व बियाण्यांचे साठवणीतील किडींपासून संरक्षण होते.

काढणीनंतरची कामे :

रब्बी पिकांची काढणी झालेल्या क्षेत्रात लगेच नांगरणी करावी. शेतातील पिकांचा पालापाचोळा, अवशेष आदी जमिनीत गाडले जातात. किडींच्या सुप्तावस्था वर कडक उन्हात येऊन मृत पावतात.

कांदा

रांगडा हंगामातील कांदा काढणीस सुरुवात करावी. काढणीअगोदर दोन ते तीन आठवडे पाणी बंद करावे. कांद्याच्या ५० ते ७० टक्के माना पडल्यानंतर काढणी करावी.

रब्बी कांदा पिकामध्ये करपा आणि फुलकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. करपा रोग नियंत्रणासाठी, टेब्युकोनॅझोल १ मिलि प्रति लिटर पाणी आणि फुलकिडींच्या नियंत्रणासाठी कार्बोसल्फान २ मिलि किंवा फिप्रोनील १ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करून घ्यावे.

रब्बी कांदा लागवडीला ६० दिवस झाले असल्यास, १३:०:४५ हे विद्राव्य खत ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी घ्यावी.

वांगी

अंकुर आणि फळ पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी,

क्लोरपायरिफॉस (२० ईसी) २ मिलि किंवा

इमामेक्टिन बेंझोएट (५ एसजी) ०.३ ग्रॅम किंवा

क्लोरॲन्ट्रानिलिप्रोल (१८.५ एससी) ०.३ मिलि किंवा

लॅम्बडा सायहॅलोथ्रिन (५ ईसी) १० मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करून घ्यावी.

टोमॅटो, मिरची

या पिकामध्ये फळ पोखरणाऱ्या अळीच्या सर्वेक्षण आणि नियंत्रणासाठी पिकाच्या लागवडीनंतर २० दिवसांनी १६ कामगंध सापळे प्रति एकरी या प्रमाणात शेतात उभारावेत.

०२४२६- २४३२३९ (प्रमुख, कृषी विद्या विभाग आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

AI In Agriculture: ऊस शेतीत एआयच्या वापरासाठी इस्माचा एडीटीसोबत करार

Agriculture Technology: हवारहित स्थितीमध्ये वाळवणाचे तंत्र

Cotton Farming Technology: कापूस तंत्रज्ञान प्रकल्पातून शेतकरी झाले जागरूक

Indian Chess Champion: बुद्धिबळातील सुवर्णकन्या!

US Import Tarrif: आयातीचा उंट तंबूत नको

SCROLL FOR NEXT