Mosambi Farmers  Agrowon
ॲग्रो विशेष

Mosambi Fruit Drop : मोसंबी फळगळीची कारणे, अडचणी आणि उपाय यांचा अहवाल सादर करा

Mosambi Crop Management : छत्रपती संभाजीनगर येथे शुक्रवारी (ता. ३०) आयोजित केलेल्या प्रगतिशील व प्रयोगशील शेतकऱ्यांच्या परिसंवादात कृषिमंत्र्यांनी मोसंबी फळगळ का होते ? हा प्रश्न मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांला विचारला.

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : येथे शुक्रवारी (ता. ३०) आयोजित केलेल्या प्रगतिशील व प्रयोगशील शेतकऱ्यांच्या परिसंवादात कृषिमंत्र्यांनी मोसंबी फळगळ का होते ? हा प्रश्न मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांला विचारला.त्यावर शेतकऱ्यांने दिलेल्या उत्तरानंतर कृषी विद्यापीठाच्या फळबाग तज्ज्ञांना मोसंबीच्या फळगळीत अडचण काय आणि परिणामकारक उपाय काय याविषयी अहवाल सादर करण्याची सूचना केली.

राज्याचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगरमधील शिवनेरी लॉन्सवर शुक्रवारी परिसंवाद आयोजित करण्यात आला होता.

परिसंवादाला मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील कापूस, मका सोयाबीन, विविध फळपीक उत्पादक, नावीन्यपूर्ण फळ पीक उत्पादक, मसाले पीक, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट, अन्नप्रक्रिया उद्योग, नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती, रेशीम उद्योग, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय, कृषी पर्यटन, ऊस, तूर, मूग व उडीद उत्पादक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ तसेच कृषी पणन सहकार महसूल आदी विभागाचे अधिकारी कर्मचारी या परिसंवादाला उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी मांडलेले प्रमुख प्रश्न व मागण्या...

विद्यापीठाद्वारे आधुनिक कापूस वेचणी यंत्र विकसित करून अनुदानावर द्या.

देशी कपाशीचे अधिक उत्पादन देणारे वाण विकसित व प्रसारित करा.

मका पिकाला रब्बी हंगामात पीक विमा उपलब्ध करून द्या.

मुरघासच्या बॅगसाठी अनुदान द्या.

लातूर येथे सोयाबीन संशोधन केंद्र द्या.

सोयाबीनसाठी मध्य प्रदेश प्रमाणे भावांतर फरक योजना राबवा.

सोयाबीनचे मूलभूत ते पायाभूत बीजोत्पादन शेतकरी गट व कंपन्यांच्या सहकार्याने घ्या.

फळबाग लाभार्थ्यांची सोडत एप्रिल मे महिन्यात करा.

अस्तरीकरण, शेततळ्याला प्राधान्याने द्या

कुंपणासाठी अनुदान द्या.

मोठ्या प्रमाणात मोसंबी प्रतवारी सेंटर उभे करा.

वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी सोलार कंपाऊंड अनुदानावर द्या.

ड्रॅगन फ्रुटचा भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेत समावेश करा, खजूरचाही फळबाग योजनेत समावेश करा.

नांदेड येथे केळी निर्यात सुविधा केंद्र उभारा.

खजूर शेतीसाठी रोपावर 80 टक्के अनुदान द्या.

हळद, आले पिकासाठी किमान आधारभूत किंमत निश्चित करा.

शेडनेट जास्त असलेल्या भागात सामूहिक सुविधा केंद्र द्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gulabrao Patil: शेतकऱ्यांना त्रास झाला तरी चालेल, पण उद्योजकांना व्हायला नको, गुलाबराव पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य, शेतकरी नेत्यानं चांगलंच सुनावलं

Farmer Loan Waive : कर्जमाफीची दुसरी यादी कधी येणार?

Marathwada Rain Update : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांतील १४३ मंडलांत हलका ते मध्यम पाऊस

Poor Seed Germination: ‘महाबीज’च्या सोयाबीनची उगवणच नाही

Loan Waiver Eligible List: नांदेड जिल्ह्यात कर्जमाफीच्या ९६ हजार पात्र यादी प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT