Manikrao Kokate Agrowon
ॲग्रो विशेष

Agri Malls : शेतकरी ते ग्राहक बाजारपेठेसाठी प्रयत्न

Manikrao Kokate : शेतकऱ्यांसाठी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ऊर्जितावस्तेत आणण्यासाठी शासनस्तरावर सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

Team Agrowon

Nashik News : शेतीमालाला योग्य भाव मिळण्यासाठी राज्यात कृषी विभागाच्या जागेवर शॉपिंग मॉल्स उभारून शेतकरी ते ग्राहक अशी हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.

चांदवड तालुक्यातील धोडंबे येथे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था कार्यालयाचे उद्घाटन व वैकुंठरथ लोकार्पणप्रसंगी मंत्री ॲड.कोकाटे बोलत होते. या वेळी खासदार भास्कर भगरे, आमदार डॉ. राहुल आहेर, माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, जिल्हा उपनिबंधक फय्याज मुलाणी, सरपंच मेघना रकिबे, संस्थेचे चेअरमन तथा सभापती नितीन उशीर,संचालक दिलीपकुमार केदार, उपसभापती केदू रकिबे, सचिव अरुण जाधव यांच्यासह संचालक मंडळ व ग्रामस्थ उपस्थित होते.

कोकाटे म्हणाले, की शेतकऱ्यांसाठी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ऊर्जितावस्तेत आणण्यासाठी शासनस्तरावर सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून अनेक नवीन कृषी योजना आखण्यात येत आहे.

या वेळी खासदार भास्कर भगरे व आमदार डॉ. राहुल आहेर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक चेअरमन उशीर यांनी केले. सुरुवातीला मंत्री ॲड.कोकाटे यांच्या हस्ते येथे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था कार्यालयाचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले.

धोडंबे सहकारी संस्थेचे कार्य उल्लेखनीय

धोडंबे सहकारी संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम असून, संस्थेचे कार्य उल्लेखनीय आहे. संस्थेचा आर्थिक लेखाजोखा पाहता या संस्थेच्या रुपये ८५ लाख रकमेच्या ठेवी व रुपये २२ लाख रकमेचा इमारत निधी बँकेत जमा आहे. तसेच संस्थेमार्फत शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या कर्जाची नियमित परतफेड होत असल्याने संस्थेची आर्थिक बाजू भक्कम असल्याचे मंत्री ॲड. कोकाटे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

India US trade deal: अमेरिकेच्या व्यापार करारामुळे भारतातील दूध उत्पादकांना धोका; एसबीआयच्या अहवालात इशारा

Crop Insurance: पीक विम्यात आता बदल अशक्य; तरीही आमदारांचे मत जाणून घेण्यासाठी बैठक: कोकाटेंची विधानपरिषदेत घोषणा

Kharif Sowing : धाराशिवमध्ये उडीद, कांदा लागवडीला प्राधान्य

Sangli Rain : सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीप

Onion Cultivation : खरीप कांदा लागवड यंदा स्थिर राहणार

SCROLL FOR NEXT