Nilwande Dam agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Irrigation : निळवंडेचे पाणी सोडा, अन्यथा रास्ता रोको ः आमदार तनपुरे

Nilvande Dam : निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्याचे हक्काचे शिल्लक एक टीएमसी पाणी एक मे पर्यंत सोडावे. अन्यथा, लाभधारक शेतकऱ्यांसह रास्ता रोको आंदोलन करून सविनय कायदेभंग केला जाईल.

Team Agrowon

Nagar News : निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्याचे हक्काचे शिल्लक एक टीएमसी पाणी एक मे पर्यंत सोडावे. अन्यथा, लाभधारक शेतकऱ्यांसह रास्ता रोको आंदोलन करून सविनय कायदेभंग केला जाईल. त्यास भाग पाडणारे जलसंपदाचे अधिकारी आंदोलनास जबाबदार असतील, असा इशारा आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिला.

राहुरी येथे रविवारी (ता. २८) तनपुरे यांनी लाभधारक शेतकऱ्यांसह तहसीलदारांची भेट घेऊन मागणी मांडली. निळवंडे धरणाचे अधीक्षक अभियंता यांच्याशी संपर्क साधून तनपुरे यांनी अंदोलनाचा इशारा दिला. निळवंडेतून प्रवरा नदीपात्रात पाणी सोडले. परंतु, उजव्या कालव्याचे पाणी सोडले नाही. त्यामुळे लाभधारक शेतकरी संतप्त झाले होते.

तनपुरे म्हणाले, की निळवंडे डाव्या कालव्याची चाचणी अगोदर झाली. त्या वेळी अडीच टीएमसी पाणी वापरले गेले. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत उजव्या कालव्याच्या चाचणीसाठी दीड टीएमसी पाणी राखीव ठेवावे, अशी मी मागणी केली होती. त्यानुसार ठराव करण्यात आला.

त्यानंतर उजव्या कालव्याची चाचणी करताना फक्त अर्धा टीएमसी पाणी वापरण्यात आले. तांत्रिक दोष दुरुस्तीच्या कामासाठी अवघ्या चार दिवसांत उजव्या कालव्याचे पाणी बंद करण्यात आले. त्यानंतर पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांनी २५ एप्रिलपर्यंत शिल्लक एक टीएमसी पाणी सोडले जाईल, असे आश्वासन दिले. परंतु, आजपर्यंत पाणी सोडण्यासाठी कोणत्याही हालचाली केल्या नाहीत.

या वेळी निळवंडेच्या लाभक्षेत्रातील शेतकरी किरण गव्हाणे, सुयोग नालकर, सुखदेव बलमे, रघुनाथ मुसमाडे, पप्पू मुसमाडे, सुहास उऱ्हे, सर्जेराव खेमनर, अण्णासाहेब खेमनर, भाऊसाहेब आडभाई, सुधाकर मुसमाडे, गोविंद वरघुडे, अनिल नालकर, साहेबराव शिंगोटे, पप्पू माळवदे, डॉ. रवींद्र गागरे उपस्थित होते.

आता निळवंडेच्या अधिकाऱ्यांनी १५ मे नंतर उजव्या कालव्याचे पाणी सोडू, असे सांगितले. लोकसभा निवडणूक झाल्यावर पाणी सोडणार म्हणजे त्यामागे राजकीय वास असल्याचे दिसते. राहुरी तालुक्यातील निळवंडेच्या लाभक्षेत्रातील निभेंरे, तुळापूर, कानडगाव, तांदूळनेर, वडनेर, कणगर, चिंचविहिरे येथे जनावरांच्या व माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे तत्काळ पाणी सोडावे. अन्यथा, रास्ता रोकोचा इशारा दिला आहे, असे तनपुरे म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heavy Rain Vidarbha : अमरावती-यवतमाळ जिल्ह्यांत ढगफुटीसदृश पाऊस

Crop Insurance : तीन लाख हेक्टरवरील पिकांना नाही विमा कवच

Heavy Rainfall Nanded : नांदेडमधील सिंदगी मंडलांत ढगफूटी

Public Lands: सार्वजनिक जमिनी हरवणार

Heavy Rain Parbhani : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २६ मंडलांत अतिवृष्टी

SCROLL FOR NEXT