Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Advance Crop Insurance : ‘अग्रिम’साठी श्रीरामपूरला आंदोलन

Crop Insurance Advance : तीन दिवसांत अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होईल, तसेच अग्रिम विमा अनुदानही लवकरच मिळेल.

Team Agrowon

Nagar News : अतिवृष्टी अनुदान आणि पीकविम्याच्या ‘अग्रिम’च्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी श्रीरामपुरला तहसीलदारांच्या दालनात बुधवारी (ता. ११) घेराव घातला. तीन दिवसांत अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होईल, तसेच अग्रिम विमा अनुदानही लवकरच मिळेल, असे लेखी आश्वासन तहसीलदारांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

श्रीरामपूर तालुक्यात अतिवृष्टी नुकसानग्रस्त मंडलांतील शेतकऱ्यांना भरपाई अनुदान मंजूर झाले आहे. कृषी व महसूल विभागाने याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांनी केवायसी व आवश्यक ती कागदपत्रांची पूर्तता करूनही अनुदान प्राप्त झाले नाही.

तहसीलदार, कृषी अधिकारी यांच्याकडे शेतकरी वारंवार हेलपाटे मारत आहेत. या बाबत चौकशी केली असता, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मागणी केल्याप्रमाणे संपूर्ण अनुदान प्राप्त झाले नाही. त्यामुळे पाच कोटी रुपयांहून अधिकचे अनुदान मागितले आहे, असे सांगण्यात आले.

तालुक्यात पावसाने सलग ४६ दिवसांपेक्षा अधिक खंड दिल्याने खरिपाचे नुकसान झाले. पीकविमा योजनेतील नियमानुसार २० दिवसांपेक्षा अधिक खंड झाल्यामुळे २५ टक्के विमा अग्रिम अनुदान विमा कंपन्यांनी तत्काळ द्यावे, अशी मागणी शासनाकडे केली.

तालुक्यातील सर्व कृषी मंडळे अग्रिम पीक विम्यासाठी पात्र ठरली असताना शासनाकडून अद्यापही विम्याची रक्कम शेतकऱ्यांना प्राप्त झाली नाही. ती तातडीने देण्यात यावी, अशी मागणी करत बुधवारी (ता. ११) शेतकऱ्यांनी आंदोलन केले. या तालुक्यातील शेतकरी सहभागी झाले होते. २५ हजार बाधित शेतकऱ्यांपैकी सुमारे १५ हजार शेतकऱ्यांना अनुदान मिळाले आहे. केवायसीअभावी काहींचे अनुदान जमा होणे बाकी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mulshi Dam: मुळशी धरण क्षेत्रात सर्वाधिक २१० मिमी पावसाची नोंद

Ranbhaji Festival: हरितोत्सवासोबत रानभाजी महोत्सवाला प्रतिसाद

Jalna Scam: जालना जिल्ह्यात २४ कोटींच्या घोटाळ्यात २८ जणांवर गुन्हे दाखल

Cotton Crop Protection: पावसानंतर कपाशीवरील रोग आणि किडींचे व्यवस्थापन

Dharashiv Rain: धाराशिव जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे करा

SCROLL FOR NEXT