Water Level Agrowon
ॲग्रो विशेष

Monsoon Rain : पावसामुळे पाणीसाठ्यात पुन्हा किंचित वाढ

Increase in Water Storage : मराठवाड्यातील ८७७ विविध प्रकारच्या प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात पुन्हा एकदा गत आठवड्याच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील ८७७ विविध प्रकारच्या प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात पुन्हा एकदा गत आठवड्याच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. गत आठवड्यात १५ टक्क्यांवर असलेला उपयुक्त पाणीसाठा २६ जुलै अखेर १७.७७ टक्क्यांवर पोहोचला आहे.

मराठवाड्यातील अकरा मोठ्या प्रकल्पात १७ टक्के, ७५ माध्यम प्रकल्पात १४ टक्के, ७४९ लघू प्रकल्पात १७ टक्के, गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यात २५ टक्के, तर तेरणा, मांजरा व रेना नदीवरील २७ बंधाऱ्यात ४८ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. पावसात नसलेला जोर पाणीसाठा वाढीतील महत्त्वाचा अडथळा आहे. त्यामुळे मराठवाड्यातील प्रकल्पांची तहान भागविण्यासाठी सातत्याने जोरदार पावसाची आवश्यकता आहे.

कोरड्या प्रकल्पांच्या संख्येत घट

मराठवाड्यातील मध्यम व लघू प्रकल्पपैकी कोरड्या पडलेल्या प्रकल्पांच्या संख्येत पाण्याची आवक झाल्याने किंचित घट झाली आहे. गत आठवड्यात मराठवाड्यातील ७५ मध्यम प्रकल्पांपैकी बीड जालना व धाराशिव मधील प्रत्येकी १ तर ७५० लघू प्रकल्पांपैकी बीडमधील २० छत्रपती संभाजीनगरमधील १६, जालन्यातील १३, धाराशिवमधील ९, लातूरमधील ३, अशा एकूण ६४ प्रकल्पांत पाण्याचा थेंब नव्हता.

ती संख्या घटून २६ जुलै अखेर ५८ वर आली आहे. मध्ये ५५ लघू, तर तीन मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे. आताच्या घडीला कोरड्या असलेल्या मध्यम प्रकल्पात जालना, बीड, धाराशिवमधील प्रत्येकी एका प्रकल्पासह कोरड्या पडलेल्या लघु प्रकल्पातील ५५ प्रकल्पांमध्ये छत्रपती संभाजीनगरमधील १६, जालन्यातील १३, बीडमधील १७, लातूरमधील तीन व धाराशिवमधील सहा प्रकल्पांचा समावेश आहे.

३१३ प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली

मराठवाड्यातील ७५ मध्यम प्रकल्पांपैकी ३७, तर ७५० लघू प्रकल्पांपैकी २७६ प्रकल्पांमधील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. जोत्याखाली पाणीसाठा केलेल्या मध्यम प्रकल्पांमध्ये छत्रपती संभाजीनगरमधील ११, जालन्यातील ५, बीडमधील ९ लातूरमधील ३, धाराशिवमधील ८, व नांदेडमधील एका प्रकल्पाचा समावेश आहे. दुसरीकडे पाणीसाठा जोत्याखाली गेलेल्या २७६ लघू प्रकल्पांत धाराशिवमधील ६६, बीडमधील ६४, लातूरमधील ५१, जालन्यातील ३८, छत्रपती संभाजीनगरमधील २७, नांदेडमधील १९, हिंगोलीतील सहा व परभणीतील पाच लघू प्रकल्पांचा समावेश आहे.

जायकवाडी थोडी आवक सुरू

जायकवाडी प्रकल्पात कालपासून पाण्याची आवक काही प्रमाणात सुरू झाली. शुक्रवारी (ता २६) सकाळी सहा वाजता जायकवाडीत ९३९ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. त्यामुळे उपयुक्त पाणीसाठा ४.५० टक्क्यांवर पोहोचला होता. २७ जुलै रोजी सकाळी सहा वाजताच्या सुमारास जायकवाडीतील पाण्याची आवक वाढून ९ हजार १०० क्युसेकवर पोहोचली होती. तर उपयुक्त पाणीसाठा ५.२१ टक्क्यांवर पोहोचला होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT