Krishi Seva Kendra  Agrowon
ॲग्रो विशेष

Krishi Seva Kendra : कृषिमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर कृषी सेवा केंद्र चालकांचा संप स्थगित

Bogus Seed Act : बियाणे आणि खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी राज्य सरकारच्या प्रस्तावित निविष्ठा कायद्याच्या निषेधार्थ कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी बेमुदत बंद पुकारणार आहेत.

Swapnil Shinde

Milk Rate News : राज्य शासनाच्या प्रस्तावित बोगस बियाणे कायदेच्या विरोधात राज्यातील कृषी सेवा केंद्र चालकांनी संप पुकारला होता. काल झालेल्या बैठकीत कृषी सेवा चालकांचा प्रश्न सोडविणार अशी आश्वासने कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्यानंतर महाराष्ट्र फर्टीलायझर्स, पेस्टिसाइड, सीड्स, डीलर्स असोसिएशनने मंगळवारी रात्री संप मागे घेतला.

कृषिमंत्री धनंजय मुंडे, कृषी आयुक्त प्रवीण गेडाम, निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाचे कृषी संचालक यांच्याशी ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’द्वारे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

राज्य शासनाच्या प्रस्तावित बोगस बियाणे, खते आणि किटकनाशक विधेयकामध्ये कृषी निविष्ठा विक्री करणाऱ्या विरुध्द कठोर कारवाई करण्याची तरतूद करण्यात आली आहे. या प्रस्तावित कायद्यास विरोध करण्यासाठी राज्यातील कृषी विक्रेत्यांनी दि. २० पासून कृषी निविष्ठा खरेदी बंद करण्यांत आली होती.

या पार्श्वभूमीवर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी बैठक घेतली. यामध्ये मुंडे यांनी नवीन कायद्यामुळे कृषी निविष्ठा विक्रेत्यावर कोणतीही कारवाई होणार नाही.कृषी निविष्ठा विक्रेत्यास साक्षीदार समजण्यांत येईल. नवीन कायद्यामुळे, कृषी निविष्ठा विक्रेत्यावर कोणतीही कारवाई होणार नाही. नवीन कायद्याबाबत संघटनाकडून आलेल्या सर्व निवेदनांचा विचार करण्यांत येईल.अभ्यास समितीमध्ये नवीन कायद्याबाबत तयार होणा-या मसुद्या बाबत,विक्रेत्यांच्या पदाधिकारी यांचेशी चर्चा करुन,सर्वांना मान्य होईल असा निर्णय घेण्यांत येईल, असे आश्‍वासित केले.

या बैठकीत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाईडस्‌ सीडस्‌ डिलर्स असोसिएशन कृषी निविष्ठा खरेदी बंद आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याचे जाहीर केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Compensation Demand: प्रति हेक्टरी ७० हजारांची भरपाई द्यावी

Natural Farming: नैसर्गिक शेतीने बळीराजा समृद्ध होणार

Rabi Intercropping: रब्बीत कोरडवाहू क्षेत्रात आंतरपिकाचे पर्याय कोणते? अधिक उत्पादनासाठी आंतरपीक गरजेचे

Irrigation Project: ‘मसलगा’च्या दुरुस्तीला वेग द्या; पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

Farmer Protest: शेतकरीपुत्रांचा भूम येथे रास्ता रोको

SCROLL FOR NEXT