Bacchu Kadu Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Protest: कर्जमाफीसाठी सरकारला भाग पाडणार

Bacchu Kadu: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा लढा अंतिम टप्प्यात आहे. तो यशस्वी झाल्यानंतर तत्काळ शेतीमाल हमीभावाच्या मुद्यावर सरकारला ‘स‍ळो की पळो’ करून सोडणार असल्याचा इशारा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सोमवारी (ता. १४) दिला.

 गोपाल हागे

Yavatmal News: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा लढा अंतिम टप्प्यात आहे. तो यशस्वी झाल्यानंतर तत्काळ शेतीमाल हमीभावाच्या मुद्यावर सरकारला ‘स‍ळो की पळो’ करून सोडणार असल्याचा इशारा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सोमवारी (ता. १४) दिला. सातबारा कोरा पदयात्रेचा अंबोडा येथे समारोप झाला. यानिमित्ताने आयोजित सभेत ते बोलत होते.

या वेळी आमदार रोहित पाटील, सत्यपाल महाराज यांची या वेळी उपस्थिती होती.बच्चू कडू म्हणाले, की शासनाने हमीभावाची नुसती घोषणा केली. मात्र हमीऐवजी शेतकऱ्यांना प्रत्येकवेळी कमी भाव देत त्यांची लूट केली. शासनाच्या या लुटीमुळेच गावखेड्यातील शेतकऱ्यांना कर्ज रक्‍कमेचा भरणा करता आला नाही.

परिणामी त्यांच्यावर कर्जाचा डोंगर वाढला आणि त्यातूनच शेतकऱ्यांच्या आत्महत्याही वाढल्या. धार्मिक उन्मादाला प्रोत्साहन देणाऱ्या भाजपने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. या प्रवृत्तींविरोधात २४ जुलैला सकाळी ९ ते ११ वेळात राज्यभरात चक्‍काजाम करण्याचा इशारा त्यांनी दिला.

आमदार रोहित पाटील यांनी शेतीचे कोणतेही ज्ञान नसलेला कृषिमंत्री राज्याला मिळाल्याची जहरी टीका या वेळी केली. द्राक्ष बागांच्या नुकसानीप्रकरणी लक्षवेधी मांडल्यानंतर स्वतः द्राक्ष पट्ट्यात राहत असलेल्या कृषिमंत्र्यांचे अज्ञान समोर आले. पंचनामा करण्याचे नाटक करताना त्यांनी ढेकळाचा पंचनामा करणार का? असा प्रश्‍न केला. त्यावरूनच त्यांची शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रति भूमिका स्पष्ट होते.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा लढा आम्ही पुकारला आहे. हा लढा आता अंतिम टप्प्यात असताना राज्यात कोठेही बॅंक अधिकाऱ्यांकडून सक्‍तीच्या कर्जवसुलीचा प्रयत्न झाल्यास त्याला ठोकून काढणार, असा इशारा या वेळी बच्चू कडू यांनी दिला.

२ ऑक्टोबरला मुंबईत ट्रॅक्‍टर मोर्चा काढणार आहे. पंजाबमधील आंदोलक नेते, शेतकरी यांना यात सहभागी करू. त्यासोबतच राज्यातील शेतकरी नेत्यांना देखील सहभागाविषयी विनंती करणार आहे. राज्यभरातून देखील शेतकरी सहभागी होतील. या माध्यमातून सरकारला कर्जमाफी देण्यास बाध्य करू. हा लढा यशस्वी झाल्यानंतर हमीभावाच्या मुद्यावर आंदोलन होईल.
बच्चू कडू, माजी राज्यमंत्री

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ramlila Maidan Farmer Protest : दिल्लीच्या रामलीला मैदानावर हजारो शेतकरी एकत्र जमले; केंद्र सरकारकडे हमीभाव कायदा, कर्जमाफीची मागणी

Farmer ID Scam: बनावट फार्मर आयडी, जमीन एकाची, अनुदान दुसऱ्याला, नेमका घोळ काय?

Kolhapur ZP President: कोल्हापूर ‘झेडपी’च्या अध्यक्षपदी शिल्पा खोत यांची बिनविरोध निवड

Water Scarcity: वर्ध्यावर पाणीटंचाईचे सावट

Unseasonal Rain Damage: शिरोळ तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा

SCROLL FOR NEXT