Kharif Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Sowing : राज्यात खरिपाचा ९६ टक्के पेरा; मूग, उडदाचा पेरा अर्धवट

kharif crops : यंदा माॅन्सूनच्या पावसाने उशिरा हजेरी लावल्या खरीपाच्या पेरण्या रखडल्या होत्या. दरम्यान, आॅगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पेरण्या आटोपल्या आहे.

Team Agrowon

Seedling of kharif crop : राज्यात चालू खरीप हंगामातील सर्व पिकांच्या पेरण्या आटोपल्या आहेत. आतापर्यंत ९६ टक्के पेरण्या झाल्या आहेत. सोयाबीनसह कापूस, मका, भात आणि तूर या मुख्य खरीप पिकांचा पेरा गेल्या हंगामाच्या तुलनेत समाधानकारक आहे.

राज्यात सरासरी १४२ लाख हेक्टरवर खरीप हंगाम घेतला जातो. १७ ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांनी यातील १३७ लाख हेक्टरपर्यंत पेरा पूर्ण केलेला आहे. गेल्या हंगामात याच कालावधीत पेरा १४० लाख हेक्टरच्या आसपास होता. सध्या काही भागांमध्ये भात पुनर्लागवडीची कामे सुरू आहेत.

खरीप पिकांमध्ये यंदा सर्वांत कमी पेरा मुगाचा झाला आहे. वेळेत पाऊस न आल्यामुळे मुगाची सरासरी ३.९३ लाख हेक्टर क्षेत्रापैकी केवळ १.७३ लाख हेक्टरवर पेरणी होऊ शकली. त्यामुळे यंदा मूग उत्पादनात मोठी घट होणार आहे. उडदाचीही तीच गत असून, ३.७० लाख हेक्टरपैकी यंदा फक्त २.४६ लाख हेक्टरवर त्याचा पेरा होऊ शकला. राज्यात खरिपाचा सर्वांत कमी पेरा सांगली जिल्ह्याचा (६३ टक्के) झालेला आहे. सांगली भागात शेतकरी सरासरी २.४७ लाख हेक्टरवर पिके घेतात. परंतु यंदा आतापर्यंत १.४५ लाख हेक्टरवर पेरा होऊ शकला. विशेष म्हणजे नगर, सोलापूर, धाराशिव, वर्धा आणि गोंदिया या पाच जिल्ह्यांमध्ये सरासरी क्षेत्रापेक्षा १०० टक्क्यांहून अधिक पेरा झालेला आहे.

कृषी विभागनिहाय खरिपाचा आढावा घेता कोल्हापूर विभागातील जिल्हे खरीप पेरण्यांमध्ये किंचित पिछाडीवर आहेत. कोकण विभागात आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत ९७ टक्के, नाशिक ९७ टक्के, पुणे १०० टक्के, छत्रपती संभाजीनगर ९७ टक्के, लातूर १०० टक्के, अमरावती व नागपूर विभागात ९९ टक्के पेरण्या झाल्या आहेत. मात्र कोल्हापूर विभागात ८२ टक्के पेरा झाला आहे. त्यात सांगलीचा पेरा ६३ टक्के असून, सातारा ८७ टक्के तर कोल्हापूरचा पेरा ९६ टक्के नोंदवला गेला आहे.

राज्यात केवळ ८८ टक्के पाऊस

एक जून ते १७ ऑगस्ट या कालावधीत राज्यात सरासरी ६९५ मिलिमीटर पाऊस होतो. यंदा मात्र केवळ ८८ टक्के पाऊस झालेला आहे. १५ जिल्ह्यांमध्ये ७५ टक्क्यांपर्यंत पाऊस झाला आहे. तर १३ जिल्ह्यांमध्ये ७५ ते १०० टक्क्यांपर्यंत पाऊस आहे. केवळ ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, पालघर, नांदेड आणि यवतमाळ या सहा जिल्ह्यांत १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे.

खरीप पेरण्यांची अंदाजे स्थिती (१७ ऑगस्टअखेर)

  • पीक---सरासरी क्षेत्र (लाख हेक्टर)--गेल्या वर्षीचा पेरा---चालू वर्षाचा पेरा (टक्के)

  • धान---१५०८३७४---१४२०९९८---१३८८४६४(९८)

  • ज्वारी---२८८६१५---१४५०७६---११२२७४ (७७)

  • बाजरी---६६९०८९---४०२५४८---३५६३६० (८९)

  • नाचणी---७८१४९---६४४५९---६७०७१ (१०४)

  • मका---८८५६०८---८७४२४९---८७७३७८ (१००)

  • तूर---१२९५५१६---११५४९५१---१०९९९२० (९५)

  • मूग---३९३९५७---२७७२९०---१७३७३५ (६३)

  • उडीद ३७०२५२---३५३५०९-----२४६७२२ (७०)

  • भुईमूग १९१५७५----१५६३२६----१३७५५५ (८८)

  • तीळ १५१६२--------६१४७-----४४०४ (७२)

  • कारळे १२४६०------४६५०----५९७० (१२८)

  • सूर्यफुल १३७८०-----१५५२१-----२५१८ (१६)

  • सोयबीन४१४९९१२—-४८३३३३५—-४९३७७८२ (१०२)

  • कापूस ४२०११२८—--४१९४७६४—--४१७५५४४ (१००)

  • - सर्व आकडे अंदाजे व हेक्टरमध्ये आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cooperative Institute : सभासदांना १८ टक्के लाभांश देणार ः ठोंबरे

Rain Crop Damage : शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा गेल्या ‘पाण्यात’

Azolla Cultivation: अझोलाचे उत्पादन कसे करावे?

Indian Agriculture 2025: थंडी यंदा रब्बी पिकांना असह्य होण्याचा धोका; IMDच्या अपडेटनंतर ICAR अलर्टवर!

APMC Farmer Facility : शेतीमाल आणणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत जेवणाचे पास ः सूर्यकांत पाटील

SCROLL FOR NEXT