Beed News: अधिक गतीने काम करून विशेषत्वाने महिलांचे जीवनमान उंचवावे. जेणेकरून येथील बालविवाहाचे प्रमाण कमी होऊ शकते. कोणी येऊन काम करेल याची वाट न बघता सर्व अधिकाऱ्यांनी हे आपलेच काम समजून स्वयं प्रेरणेने करण्याची गरज आहे, असे मत नवीन आणि नवीनिकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या संचालक सुमन चंद्रा यांनी व्यक्त केले. .वडवणी आकांक्षित तालुका विकास कामांचा आढावा सोमवारी (ता. २२) घेण्यात आला. त्या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान तसेच अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक, जिल्हा नियोजन अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांची प्रमुख उपस्थित होती..Women Empowerment: ग्रामीण-आदिवासी महिलांच्या सशक्तीकरणासाठी राज्य सरकारचे मोठे पाऊल; फडणवीसांच्या हस्ते उमेद-राह करार.चंद्रा म्हणाल्या, ‘‘आकांक्षित तालुकाअंतर्गत वडवणीमधील प्रगती चांगले आहे. या आकांक्षित तालुका कार्यक्रमाअंतर्गत आरोग्य, पोषण, शिक्षण, कृषी, सामाजिक विकास आणि पायाभूत सुविधा या सात मुद्द्यांवर आधारित उद्दिष्टे ठरवून विकास करावयाचा आहे. बीडमध्ये बदल घडत आहे याचा संदेश दिला गेला पाहिजे. या ठिकाणी असणाऱ्या बालविवाह समस्येचे मूळ विविध कारणांमध्ये आहे. त्यामुळे मुलींचे शिक्षण त्यांचे समाजातील स्थान आणि त्यांच्या कार्याचे मोल या मुद्द्यांवर लक्ष दिले गेले पाहिजे..’’ समस्येचा शोध घेतला आहे. त्याची योग्य कारणमीमांसा व त्यावर सकारात्मकपणे उपाययोजना या माध्यमातून विकास साधता येईल. बालविवाहाच्या समस्येवर लक्ष केंद्रित करताना त्याला प्राधान्य दिले तर बालविवाह करण्याचे प्रमाण कमी होईल. मुलींना शिक्षणात प्राधान्य देण्याबाबत प्रसिद्धी तसेच प्रत्यक्ष यांच्यात जाणीव जागृती गरजेची आहे. कार्यक्रमांतर्गत बचत गटांना केवळ मर्यादित भूमिकेत न ठेवता त्यांना उद्योग प्रशिक्षण आणि त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे. .Women Empowerment : कष्टातून उभारला राजगिरा लाडू व्यवसाय.या गटांना मुद्रा कर्ज योजनेतून अधिकाधिक व्यवसाय आणि उद्योग यासाठी प्रोत्साहित करण्यासोबतच प्रशिक्षित करण्याची गरज आहे. विकासाचा आढावा केवळ आकडेवारीवर न घेता प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या जीवनात त्याचा किती लाभ झाला आहे याचे चित्रण आगामी काळात मांडावे. शक्य तितक्या प्रमाणात आवास योजना तसेच प्रधानमंत्री सूर्यघर आणि शेतकऱ्यांसाठीच्या सुमन योजनेअंतर्गत अधिकाधिक लाभ देण्याच्या दृष्टीने अभ्यास करा व माहिती सादर करा, असे निर्देशही त्यांनी या वेळी दिले..आकांक्षित वडवणी कामाबाबत प्रथम क्रमांकावरदेशात ५०० ब्लॉकमधील तालुक्यांमध्ये आकांक्षित तालुका कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत मागासलेल्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे उद्दिष्ट केंद्र शासनाने ठेवलेले आहे. यामध्ये वडवणी तालुका देशात ११७ व्या क्रमांकावर असून चार झोनअंतर्गत ६९ ब्लॉकमध्ये बारावा आणि राज्यात वडवणी तालुका कामाच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.