Crop Management Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Techniques : फळे, भाजीपाला व्यवस्थापनातील सुधारित तंत्र

Vegetable Crop Management : पीक लागवडीपासून ते काढणीपर्यंत फळे, भाजीपाल्याची गुणवत्ता चांगली ठेवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान वापरणे आवश्‍यक झाले आहे.

यशवंत जगदाळे,

Crop Management : पीक लागवडीपासून ते काढणीपर्यंत फळे, भाजीपाल्याची गुणवत्ता चांगली ठेवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान वापरणे आवश्‍यक झाले आहे. जैविक आणि अजैविक ताणांमध्येही उत्तम प्रतीचे पीक उत्पादन करण्यासाठी हे तंत्रज्ञान फायदेशीर ठरणार आहे.

फळे, भाजीपाला पिकांच्या दर्जेदार उत्पादनासाठी सुधारित आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर फायदेशीर ठरतो. या तंत्रज्ञानाच्या वापराने गुणवत्तापूर्ण शाखीय वाढ, कीड,रोग विरहित उत्पादन मिळण्यास फायदा होतो.

फॅब्रिक क्रॉप कव्हर (२७ जीएसएम)

रंग ः पांढरा, निळा, लाल, पिवळा.

तंत्रज्ञानाचे फायदे

२० टक्के उत्पादन खर्च कमी करते. किडींचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत करते.

रोप लागवडीनंतर मरीचे प्रमाण ३०टक्यांपर्यंत कमी करते. पिकाला क्रॉप कव्हर टाकल्यानंतर फवारणी करताना कोणतीही अडचण येत नाही.

नॉन वोव्हन फॅब्रिक फ्रूट कव्हर (१७ जीएसएम)

रंग ः पांढरा, निळा, लाल.

तंत्रज्ञानाचे फायदे

२० टक्के उत्पादन खर्च कमी होतो.

हे एक विशेष प्रकारचे जाळीदार कव्हर आहे. फळाला चकाकी आणि रंग आणण्यास उपयुक्त.

सध्या डाळिंब, पेरू पिकामध्ये जास्त फायदेशीर दिसून येत आहे.

हे आवरण फळांवर घातल्याने पक्षी, फळमाशी आणि तीव्र सूर्यप्रकाशापासून संरक्षण मिळते. यामुळे फळांची गुणवत्ता सुधारते,नुकसान कमी होते.

ग्रो वायर / प्लॅस्टिक वायर (२.५ व ५ मि.मी.)

रंग ः काळा

तंत्रज्ञानाचे फायदे

भाजीपाला, फळपिकाला आधार देण्यासाठी उपयुक्त. सर्व प्रकारच्या जी.आय. तारेसाठी पर्याय.वापरण्यास फायदेशीर.

डाळिंबाच्या फांद्यांना योग्य आधार देणे आवश्यक असते. ग्रो वायरच्या साहाय्याने फांद्यांना योग्य आधार मिळतो. यामुळे फळांचे उत्पादन वाढते. फळांची गुणवत्ता सुधारते.

झाडाला योग्य आकार मिळतो, त्याची देखभाल सुलभ होते.

१५ टक्के उत्पादन खर्च कमी होतो.

विड मॅट (१०० जीएसएम)

रंग ः काळा, तांबडा, पांढरा, हिरवा.

तंत्रज्ञानाचे फायदे

सर्व प्रकारच्या फळपिकांसाठी उपयुक्त. एकवर्षीय आणि बहुवर्षीय तणांच्या नियंत्रणासाठी फायदेशीर.

१०० जीएसम जाडीचे वीड मॅट जमिनीवर पसरल्याने तण वाढू शकत नाही.

जमिनीचे तापमान नियंत्रित राहते, ओलावा टिकून राहतो. यामुळे झाडांची वाढ उत्तम होते, उत्पादन वाढते. जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत मिळते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनचे दर स्थिर, कापूस आवक सुधारतेय; काकडी व लसणाला वाढीला उठाव, मोसंबीचे दर स्थिर

Upasa Irrigation Scheme: उपसा सिंचन योजनेतून संगमनेरमधील १४ गावांचा पाणीप्रश्न सुटणार; महायुती सरकारच्या निर्णयाची विखे पाटलांकडून माहिती

Sugarcane Rate: ‘स्वाभिमानी’च्या रेट्यामुळेच सांगलीत कारखान्यांकडून ऊसदर जाहीर

Farmer Compensation: पन्हाळ्यातील ३३४० शेतकऱ्यांना भरपाईची प्रतीक्षा

Hawaman Andaj: थंडीचा कडाका वाढण्याचा अंदाज; कोकणात कमाल तापमानाचा पारा कायम

SCROLL FOR NEXT