Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Agrim Pik Vima : मार्चअखेर अग्रिम विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल ः कोकाटे

Crop Insurance : ३१ मार्च अखेर शेतकऱ्याच्या खात्यावर बीडीएस द्वारे रक्कम जमा होईल, असे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी बुधवारी (ता. १९) विधानसभेत सांगितले.

Team Agrowon

Parbhani News : वित्त विभागाकडून निधी वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू असून कृषी विभागाकडे येत्या चार दिवसांत निधी वर्ग होईल. ३१ मार्च अखेर शेतकऱ्याच्या खात्यावर बीडीएस द्वारे रक्कम जमा होईल, असे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी बुधवारी (ता. १९) विधानसभेत सांगितले. परभणी जिल्ह्यातील प्रलंबित पीकविमा अग्रिम अदायगी संदर्भातील पाथरी (जि. परभणी) येथील आमदार राजेश विटेकर विचारलेल्या लक्षवेधीला कृषिमंत्री कोकाटे यांनी उत्तर दिले.

परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप २०२४ मध्ये मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती अंतर्गंत सोयाबीन, कपाशी, तूर या पिकांच्या नुकसानीबद्दल ३३५ कोटी ९० लाख रुपये अग्रिम विमा मंजूर आहे. परंतु राज्य शासनाकडून आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल विमा कंपनीला ९९ कोटी रुपये विमा हप्ता येणे बाकी असल्यामुळे अग्रिम विमा वाटप करू शकत नाही, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी कृषी आयुक्तलयास कळविले होते.

मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत ३० सप्टेंबर २०२४ रोजी अधिसूचना काढली. त्यानंतर एक महिन्याच्या आत अग्रिम पीकविमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणे नियमाप्रमाणे बंधनकारक होते. परंतु जवळपास साडेपाच महिने उलटून गेल्यावरही प्रत्यक्षात पीक विमा मिळालेला नाही, अशी खंत आमदार राजेश विटेकर यांनी लक्षवेधी दरम्यान बोलताना व्यक्त केली.

विमा कंपनी व शासन यांच्यामुळे शेतकरी आर्थिक मदत पासून वंचित राहिलेले आहेत. शासन त्यांच्या हिश्याचे ९९ कोटी रुपये विमा हप्ता रक्कम किती दिवसात भरणार आहे? शेतकऱ्यांना प्रत्यक्षात किती दिवसात पीकविमा मिळणार आहे? अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना ५४८ कोटी रुपयांपैकी ४६७ कोटी रुपये वाटप करण्यात आले होते.

परंतु वाटप राहिलेल्या १ लाख २९ हजार शेतकऱ्यांची ८१ कोटी रुपयांची रक्कम केव्हापर्यंत त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे? आयसीआयसीआय लोंबार्ड विमा कंपनीस काळ्या यादीत टाकणार का, असे प्रश्‍न आमदार विटेकर यांनी लक्षवेधीद्वारे शासनाला विचारले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Purandar Airport: हरकती घेतल्यानंतरही विमानतळासाठी जमिनी का घेता?

Chakan Market: चाकण बाजारामध्ये काशीफळाच्या मागणीत वाढ

Pune Rain: घाटमाथ्यावर संततधार सुरूच; धरणांतून विसर्ग

Manikrao Kokate: कृषिमंत्री कोकाटेंबाबत आज निर्णय होणे शक्य

Lumpy Skin Disease: सोलापुरात ‘लम्पी’चा संसर्ग वाढला; संपूर्ण जिल्हा नियंत्रित क्षेत्र घोषित

SCROLL FOR NEXT