Advance Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Advance Crop Insurance : नांदेडला अग्रिम विमा वाटपाला गती

Crop Insurance : नांदेड जिल्ह्यात जुलैमध्ये झालेली अतिवृष्टी तसेच ऑगस्टमधील पावसाची अनियमितता यामुळे खरिपातील पिकांचे ५० टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले होते.

Team Agrowon

Nanded News : प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील सर्वच ९६ महसूल मंडळामध्ये सोयबीन पिकासाठी हंगामातील प्रतिकूल परिस्थिती (मिड सिझन अँडव्हर्सिटी) जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी मंजूर केली होती. या घटकानुसार जिल्ह्यात आतापर्यंत २१४ कोटी ६२ लाख रुपयांच्या अग्रिम विमा वाटप झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्राने दिली.

नांदेड जिल्ह्यात जुलैमध्ये झालेली अतिवृष्टी तसेच ऑगस्टमधील पावसाची अनियमितता यामुळे खरिपातील पिकांचे ५० टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले होते. अशावेळी जिल्ह्यातील पीक विमाधारक शेतकऱ्यांना पीक नुकसानीच्या २५ टक्के अग्रिम रक्कम मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनास अधिसूचना काढण्याबाबत सूचना शासनाकडून दिल्या होत्या.

यानुसार नांदेड जिल्ह्यात २८५ कोटींचा अग्रिम विमा मंजूर झाला आहे, त्यापैकी आता पर्यंत २१४ कोटी ६२ लाखांपेक्षा अधीकची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे, उर्वरित रक्कमही लवकरच जमा होणार असल्याची माहिती विमा कंपनी दिली आहे.

परतावा मिळण्यास विलंब

अग्रिम पीकविमा वाटपाचे काम पंधरा दिवसापूर्वी सुरु करण्यात आले. परंतु या कामात गती नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना याबाबत प्रतिक्षा करावी लागत आहे. शासनाकडून तर दिवाळीत अग्रिम वाटपाचे नियोजन होते.

परंतु नांदेडला मात्र विमा कंपनीकडून मंजुरी मिळाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पडण्यास नवीन वर्षाचा वाट पहावी लागली. आतातरी शेतकऱ्यांना लवकर विमा मिळावा, अशी अपेक्षा सर्व शेतकरी करता आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT