Artist Shantabai Londhe
Artist Shantabai Londhe agrowon
ॲग्रो विशेष

Lavani Samradni Shantabai : कलावंत शांताबाई लोंढे यांच्यासाठी प्रशासनाची धावपळ

Suryakant Netke

Nagar News : एकेकाळी खान्देशासह महाराष्ट्रातील तमाशाचा फड गाजवणाऱ्या वयोवृद्ध कलावंत शांताबाई लोंढे कोपरगावकर यांचा कफल्लक अवस्थेतील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शासन आणि प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

कोपरगाव (जि. नगर) येथील द्वारकामाई वृद्धाश्रमात माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी रवानगी केल्यानंतर रविवारी (ता. २५) नगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी शांताबाई कोपरगावकर यांची भेट घेऊन विचारपूस केली.

शांताबाई यांचे पुनर्वसन करण्यासाठी काय करता येईल, याबाबत प्रशासनाची धावपळ सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. शांताबाई लोंढे कोपरगावकर या उतारवयात अत्यंत दयनीय अवस्थेत कोपरगाव (जि. नगर) येथील बसस्थानकात अनेक दिवसापासून मुक्कामी होत्या.

वेडसर महिला म्हणून त्यांची फारशी कोणी दखल घेतली नाही. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना ही माहिती मिळाल्यावर सरकारी पातळीवर तातडीने हालचाली सुरू झाल्या.

मुख्यमंत्री कार्यालयाने दखल घेतल्याने, रविवारी (ता. २५) जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी या वृद्धाश्रमास भेट देऊन त्यांची विचारपूस केली. मंत्री मुनगंटीवार यांनी समाजकल्याण सहायक आयुक्तांशीही संपर्क करून शांताबाईंना मदतीच्या सूचना दिल्या.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही जिल्हाधिकारी सालीमठ व येरेकर यांना सूचना दिल्या. शांताबाई यांना अंत्योदय तसेच केंद्र पुरस्कृत कलाकार मानधन योजना, घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा

Jal Jivan Mission : निधी खर्च केला, पण गावांत पाणीच नाही

Maharudra Mangnale : कडूनिंबांशी दोस्ती ! : महारुद्र

Illegal Cotton Seed : ३१ लाखांचे अवैध एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Food Safety India : एफएसएसएआयचा 'कॅल्शियम कार्बाइड'च्या वापराबाबत इशारा; वापर टाळण्याच्या केल्या सूचना

SCROLL FOR NEXT