Hivare Bazar  Agrowon
ॲग्रो विशेष

Hivre Bazar News : आदर्श गाव हिवरे बाजार राष्ट्रनिर्माणाची प्रयोगशाळा

Rural Development : केंद्रीय जलसंपदा विभागाचे सचीव राममोहन मिश्रा यांनी आदर्शगाव हिवरेबाजार येथे भेट देऊन विकासकामांची पाहणी केली.

Team Agrowon

Ahilyanagar News : हिवरे बाजार येथे पंचायतीच्या पुढाकारातून व ग्रामसभेच्या पाठबळातून केलेल्या विकासकामांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे गावातील दारिद्रय व स्थलांतर थांबले आणि पाणी, माती व पर्यावरणाचा विचार या गावात होतो आहे म्हणून हिवरे बाजार ही राष्ट्रनिर्माणाची प्रयोगशाळा आहे, असे मत केंद्रीय जलसंपदा विभागाचे सचीव राममोहन मिश्रा यांनी व्यक्त केले.

केंद्रीय जलसंपदा विभागाचे सचीव राममोहन मिश्रा यांनी आदर्शगाव हिवरेबाजार येथे भेट देऊन विकासकामांची पाहणी केली. पद्मश्री पोपटराव पवार यांनी विकासकामांची मिश्रा यांना माहिती दिली. मिश्रा म्हणाले, की हिवरे बाजार येथे पंचायतीच्या पुढाकारातून व ग्रामसभेच्या पाठबळातून केलेल्या विकासकामांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे गावातील दारिद्रय व स्थलांतर थांबले आणि पाणी, माती व पर्यावरणाचा विचार या गावात होतो आहे.

म्हणून हिवरे बाजार ही राष्ट्रनिर्माणाची प्रयोगशाळा आहे, असे मत त्यांनी मांडले. हिवरे बाजार येथे झालेल्या विकासकामांची यशोगाथा आय. आय. एम., आय. आय. टी., मसुरी प्रशिक्षण केंद्र याठिकाणी प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणासाठी ठेवण्यास सांगितले.

प्रशिक्षणातून काम समजते परंतु अंतरमनातील प्रेरणा महत्त्वाची असून ती मला हिवरे बाजारमध्ये मिळाली. सन २००७ हिवरे बाजारला प्रथम राष्ट्रीय जल पुरस्कार मिळाला तेव्हा ते जलसंपदा मंत्रालयाचे सचिव होतो, असे ते म्हणाले.

यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेशजी ओला, संचालक मृद्संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन रफिक नाईकवडी, अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, नायब तहसीलदार अनिल तोरडमल, पोलिस निरीक्षक प्रल्हाद गीते, मेजर शिवाजी पालवे, सरपंच विमल ठाणगे, छबुराव ठाणगे, रामभाऊ चत्तर, बाबासाहेब गुंजाळ, एस. टी. पादीर, रो. ना. पादीर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mung Urid Threshing: मूग आणि उडीदाची मळणी करताना काय काळजी घ्यावी?

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीमध्ये धोरणात्मक निर्णय घेऊ नका: उच्च न्यायालय

Farmer Payment: कांदा खरेदीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

Turmeric Disease: हळदीवर कंदकुज रोगाचा धोका, नियंत्रणासाठी सोपे मार्गदर्शक उपाय

Cooperative Commissionerate: सावकारांनो, कर्ज देताना व्याजदराचा फलक लावा: सहकार आयुक्तालय

SCROLL FOR NEXT