Illegal Grain Procurement Agrowon
ॲग्रो विशेष

Illegal Grain Procurement : अवैध धान्य खेडा खरेदी करणाऱ्यांवर कारवाई करणार

Market Committee : स्थानिक बाजार समितीच्या माध्यमातून अवैधपणे खेडा खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.

Team Agrowon

Buldana News : स्थानिक बाजार समितीच्या माध्यमातून अवैधपणे खेडा खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. जे व्यापारी समितीची बाजार फी चुकवीत असल्याचे निदर्शनास येईल, अशा व्यापाऱ्यांविरुद्ध बाजार फीच्या तीनपट दंड वसूल करण्यात येऊन संबंधिताविरुद्ध बाजार कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा बाजार समितीचे सभापती गोपाळराव मिरगे यांनी केले आहे.

शेगाव तालुक्यातील व तालुक्याबाहेरील काही व्यापारी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन बाजार समितीची कोणतीही परवानगी अथवा परवाना न घेता शेतीमाल धान्य खरेदी करीत असल्याचे बाजार समितीच्या निदर्शनास आले आहे.

यामध्ये शेतकऱ्यांना आपल्या मालाला कमी भाव मिळण्याची तसेच व्यवहारात आर्थिक फसवणूक सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाहेरील अवैध शेतीमाल खरेदीमध्ये काटा मारणे, वजनकाटा तफावत इत्यादी प्रकार सुद्धा घडण्याची शक्यता असते.

पर्यायाने अशा व्यवहारात बाजार समितीचा सेस व शासनाचा महसूल सुद्धा बुडतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला शेतमाल अशा व्यापारी लोकांना न विकता बाजार समितीच्या आवारातच जाहीर लिलावात विक्रीसाठी आणावा, असेही मिरगे यांनी म्हटले आहे.

बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांसाठी अल्प ६ टक्के व्याजदराने शेतीमाल तारण कर्ज योजना राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना आपल्या शेतीमालाला जास्त भाव मिळावा हा या योजनेचा उद्देश आहे.

बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी आपला शेतमाल जाहीर लिलावात विक्री केल्यास त्याचे वजनमापे सीसीटीव्ही समोर इलेक्ट्रॉनिक्स वजनकाट्याद्वारे होऊन त्याची आवक नोंद होते. काटापट्टी, हिशेबपट्टी तयार होते जेणे करून त्या व्यवहारात पारदर्शकता, सुरक्षितता राहते.

त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या आवाराबाहेर अवैध धान्य खेडा खरेदी करणाऱ्या कोणत्याही व्यापाऱ्यांच्या आमिषाला बळी न पडता आपला शेतीमाल बाजार समिती आवारातच विक्रीसाठी आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सचिव विलास पुंडकर यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Cultivation Issue: केळी लागवडीसाठी दर्जेदार कंद मिळेनात

Groundnut Seed Issue: ‘कृषी’कडून वितरित भुईमूग बियाण्यांवर शेतकऱ्यांची नाराजी; गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

Shaktipeeth Highway Protest: शक्तिपीठ महामार्गाविरोधात विट्यात महिलांचा मोर्चा

Agri Power Supply Issue: शेतीसाठी सलग सहा तास वीज द्या; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Cattle Conservation: गोवंश संवर्धनाचा भार शेतकरी-गोपालकांवर पडू नये; खासदार मेधा कुलकर्णी यांची अपेक्षा

SCROLL FOR NEXT