River Pollution Agrowon
ॲग्रो विशेष

Pollution Control Board : प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून रोह्यात कारवाईचा बडगा

MIDC Pollution Update :धाटाव एमआयडीसीतील अनेक रासायनिक कंपन्यांमधील लाखो लिटर सांडपाणी प्रक्रिया न करता दररोज कुंडलिका नदीत सोडले जाते. त्यामुळे नदी काळवंडली असून उग्र दर्प येतो.

Team Agrowon

Roha News : धाटाव एमआयडीसीतील अनेक रासायनिक कंपन्यांमधील लाखो लिटर सांडपाणी प्रक्रिया न करता दररोज कुंडलिका नदीत सोडले जाते. त्यामुळे नदी काळवंडली असून उग्र दर्प येतो.

याबाबत सोमवारी (ता.४) ‘सकाळ’ मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत, पाण्याचे नमुने घेतले. या पाण्यात रसायन आढळल्‍याने एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांनी कारखानदार आणि एमआयडीसीला नोटीस बजावली आहे.

धाटाव एमआयडीसीतील काही रासायनिक कंपनीचे अधिकारी येथील सीईटीपी केंद्रातील कर्मचाऱ्यांशी हातमिळवणी करून सांडपाण्यावर प्रक्रिया न करता थेट नाल्यात सोडतात. हा गोरखधंदा मध्यरात्री ते पहाटेपर्यंत होत असल्‍याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे.अवकाळी पावसात दूषित पाणी तर थंडीत धुक्याचा गैरफायदा घेत घातक रसायने हवेत सोडली जातात. त्याचा मानवी जीवनाबरोबरच पशु-पक्ष्यांवर गंभीर परिणाम होतो.

कुंडलिका नदीकाठी जाऊन दूषित पाण्याचे काही नमुने तपासले. त्यात नदीच्या पाण्यात रसायन सदृश द्रव्य आढळले आहेत. ते चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले असून त्या चाचणीच्या अहवालानंतर कारवाई करण्यात येईल.
राज कामत, वरिष्ठ अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ
पर्यावरण कायद्यांतर्गत घातक व इतर रासायनिक सांडपाण्याची विल्हेवाट शास्‍त्रोक्त पद्धतीने करणे बंधनकारक करण्यात यावे. कारखानदारांनी रासायनिक सांडपाणी थेट नदीत सोडणे बंद करावे. सीईटीपीने रासायनिक सांडपाण्याची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने तातडीने करावी. त्यासाठी कारखानदार आणि एमआयडीसी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.
समीर शेडगे, तालुकाप्रमुख, ठाकरे गट

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Loss Compensation : काही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

Agriculture Technology: पीक अवशेषातून हरित ऊर्जा निर्मितीचे कार्बन-निगेटिव्ह तंत्रज्ञान

E-Pik Pahani: शेतकऱ्यांना थेट बांधावर ई-पीक पाहणीचे प्रात्यक्षिक

Shetkari Bhavan: पंचेचाळीस शेतकरी भवन बांधण्यास मान्यता

Buldhana Heavy Rain: जोरदार पावसाने सिंदखेडराजा तालुक्यात पिकांचे नुकसान

SCROLL FOR NEXT