Tree Conservation Agrowon
ॲग्रो विशेष

Illegal Cutting Trees : अवैध वृक्षतोड, वाहतुकीवर कारवाईचा बडगा

Forest Department News : अवैध वृक्षतोड तसेच वाहतुकीवर वरिष्ठांच्या आदेशानुसार वन विभागाकडून कठोर पाऊल उचलत कारवाई केली जात असल्याने वृक्षप्रेमींकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

Team Agrowon

Nashik News : अवैध वृक्षतोड तसेच वाहतुकीवर वरिष्ठांच्या आदेशानुसार वन विभागाकडून कठोर पाऊल उचलत कारवाई केली जात असल्याने वृक्षप्रेमींकडून समाधान व्यक्त केले जात आहे. दरम्यान शुक्रवारी (ता. २०) रात्री वनकर्मचारी गस्तीवर असताना चिराई घाटात अवैध लाकूड वाहतूक करणारा ट्रक ताब्यात घेतला असून कारवाई सुरू असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले.

मालेगाव प्रादेशिकसह ताहराबाद व सटाणा परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध वृक्षतोड करून बिनबोभाट वाहतूक केली जात होती. याबाबत नाशिक वन विभागाच्या अधिकाऱ्यांना वृक्षप्रेमींकडून तक्रार करण्यात आली होती. वरिष्ठांकडून अवैध वृक्षतोड व वाहतुकीवर तातडीने दखल घेत ताहराबाद, सटाणा व मालेगाव परिसरात रात्रीतून गस्त वाढवून कारवाई करण्यासाठी आदेश देण्यात आले होते.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, तीनही वनपरिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रात्रीतून गस्त वाढवून अनेक लाकूड वाहतुकीवर कारवाई केली आहे. ताहराबाद वनपरिक्षेत्रातील वनकर्मचारी रात्रीतून गस्तीवर असताना चिराई (ता. बागलाण) घाटातून ट्रकला अटकाव करून पहाणी केली असता लाकडाने खचाखच भरलेला आढळून आला.

वनकर्मचाऱ्यांनी याबाबत वरिष्ठांना माहिती देऊन ट्रक जप्त करून वन विभागातील आवारात उभा केला असून कारवाईचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. दुसरा टेम्पो सोमपूर येथे रात्री पकडण्यात आला होता. मात्र या टेम्पोतून बाभळीची लाकडे असल्याने सोडून देण्यात आले.

वरिष्ठांच्या आदेशानुसार वन विभागाकडून रात्रीतून गस्त वाढविण्यात आली असून अवैध वृक्षतोड व वाहतुकीवर कारवाई केली जात आहे. तसेच शेतकऱ्यांना शेतातील झाडांची अडचण होत असेल तर रितसर परवानगी घ्यावी.
-शिवाजी सहाणे, वनपरिक्षेत्र आधिकारी, ताहराबाद.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

Drip Irrigation Subsidy: ठिबक सिंचनासाठी ५५ टक्के अनुदान, दुसऱ्या टप्प्यात २०६ कोटी निधी मंजूर

Cocopeat Sterilization: कोकोपीटचे निर्जंतुकीकरण करताना...

SCROLL FOR NEXT