Women Empowerment Agrowon
ॲग्रो विशेष

Women Empowerment : केंद्र, राज्य सरकारमधील दुवा म्हणून काम करणार

Dr. Jaysiddheshwar Shivacharya : केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधील दुवा म्हणून आपण सर्व ते सहकार्य करू, असे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी सांगितले.

Team Agrowon

Solapur News : महिलांच्या सबलीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार वेगवेगळ्या योजना आखत आहे. उज्ज्वला योजनेतून बोरामणीतील ६११ महिलांना गॅस जोडणी देण्याचे काम झाले आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधील दुवा म्हणून आपण सर्व ते सहकार्य करू, असे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी सांगितले.

बोरामणी (ता.दक्षिण सोलापूर) येथील एसव्हीसीएस प्रशालेच्या प्रांगणात यशस्विनी अॅग्रो प्रोड्यूसर कंपनी, जय सेवालाल इंडियन गॅस कंपनीअंतर्गत आयोजिलेल्या गॅस वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.

या वेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, महेश साठे, मनीष काळजे, सागर सोलापूरे, वैभव ह्लसगे, सैफन फुलारी, शिवानंद कट्टीमनी, राजकुमार मोरे, लालासाहेब तांबडे, रामचंद्र माळी, संकेत जाधव, पूनम पटले, अंबिका पाटील, सौरभ राउत, श्रीकांत गोसावी, श्री. जोजन, बिपीन करजोळे, परमेश्वर सुतार, सुनील बोराळे, रामचंद्र होनराव, राजकुमार झिंगाडे, धनंजय गाडवे, श्री.गुरव, मधुकर चिवरे, सिद्धाराम हेले, इरेशा अंबारे, मुनिरुदीन पठाण, परमेश्वर कुंभार, सुरेश राठोड, आकाश गिराम उपस्थित होते.

खासदार डॅा. महास्वामी म्हणाले, ‘‘यशस्विनी अॅग्रो कंपनीचे कार्य कौतुकास्पद आहे. विविध उपक्रमातून महिलांना रोजगार देण्यासह आधार देण्याचे मोठे काम कंपनीकडून होते आहे,’’ असे ते म्हणाले,

१२ लाखांचा निधी मंजूर

बोरामणीत महिलाच्या विकासकामासाठी यशस्विनी शेतकरी कंपनीसाठी खासदार डॉ. शिवाचार्य महास्वामी यांनी विविध कामासाठी १२ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे, तर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे २५ लाखाच्या कामाचे निवेदन देण्यात आले. महिलांना बैठकीसाठी बोरामणीत जागा उपलब्ध नाही, ती तातडीने उपलब्ध करून देण्याबाबतही आमदार कल्याणशेट्टी यांनी आश्वासन दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

Agriculture Admission 2026: कृषी शिक्षण प्रवेशासाठी दुसऱ्या फेरीला सुरुवात

Farmer Children Protest: एकरकमी एफआरपीसाठी शेतकरी पाल्यांचे आंदोलन

Prof. Yasmin Sheikh Dies: ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ प्रा. यास्मिन शेख यांचे निधन

SCROLL FOR NEXT