Agriculture Minister Manikrao Kokate Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Compensation : शहानिशा करूनच पाऊस नुकसान पंचनाम्यांचा निर्णय ; कृषिमंत्री माणिकराव कोकाटे

Agriculture Minister Manikrao Kokate : पाऊस काही ठिकाणी पोषक, तर कुठे घातकही ठरतो. त्यामुळे संपूर्णपणे शहानिशा करूनच पंचनाम्यांबाबत निर्णय घेतला जाईल, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले.

 गोपाल हागे

Akola News : शेतकऱ्यांचे पावसामुळे नुकसान झाल्याबाबत जोपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत अहवाल येत नाही, तोवर पंचनामे होणार नाही. काही भागांत पाऊस झाला आहे, तर काही ठिकाणी नाही. हा पाऊस काही ठिकाणी पोषक, तर कुठे घातकही ठरतो. त्यामुळे संपूर्णपणे शहानिशा करूनच पंचनाम्यांबाबत निर्णय घेतला जाईल, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले.

राज्यात निर्माण झालेल्या पावसाच्या परिस्थितीबाबत शुक्रवारी (ता. २७) पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नावर ते बोलत होते. डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीचे औचित्य साधून येथील कृषी विद्यापीठात ‘ॲग्रोटेक २०२४’ चे आयोजन करण्यात आले आहे.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या निधनामुळे शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आल्याने उद्‍घाटनाचा सोहळा रद्द करण्यात आला. श्री. कोकाटे यांच्या हस्ते औपचारिकपणे डॉ. पंजाबराव देशमुख व डॉ. मनमोहनसिंग यांच्या प्रतिमांना अभिवादन करून उद्‍घाटन करण्यात आले. या वेळी विद्यापीठातील दालनांची त्यांनी पाहणी केली.

‘इन्फ्रास्ट्रक्चर अपडेट व्हायला हवे’

कृषी खाते, कृषी विद्यापीठांचे विविध प्रश्‍न आहेत. त्यांच्या या मुद्यावर मला मुख्यमंत्री, वित्त मंत्र्यांसोबत चर्चा करावी लागेल. कृषिखात्याला अधिक निधी कसा मिळेल यासाठी पाठपुरावा करू.

राज्यात कृषी विद्यापीठांमध्ये पदे रिक्त आहेत, ही वस्तुस्थिती आहे. त्याची संपूर्ण माहिती घेऊन सर्वांगीण आढावा घ्यावा लागेल. कृषी विद्यापीठांना कंत्राटी पद्धतीने माणसे घेण्याची परवानगी आहे. मात्र त्यांचे वेतन वेळेवर होत नाही, अशी एक तक्रार आहे, असेही कृषिमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Krushi Anudan: नांदेडमध्ये कृषी यांत्रिकीकरणातून १२.७० कोटींचे अनुदान वितरित

Raju Shetti: बोगस आणि निकृष्ट खते, कीडनाशकांमुळे आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान, राजू शेट्टींकडून कारवाईची मागणी

Maharashtra Khat Satha: खरिपासाठी १.५० लाख टन युरिया, २५ हजार टन डीएपीचा संरक्षित साठा

Pani Tanchai Upay: पाणी टंचाईवर मात करत पेणच्या शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

Bhat Sheti in Maharashtra: सूर्या प्रकल्पामुळे उन्हाळी भातशेती बहरली

SCROLL FOR NEXT