Vijapur Accident Agrowon
ॲग्रो विशेष

Karnataka Accident : मका प्रक्रिया कारखान्यात मोठी दुर्घटना, गोण्या पडल्याने ६ जणांचा मृत्यू

maize processing unit : कर्नाटकात एक मोठी दुर्घटना घडली आहे. विजापूरातील मका प्रक्रिया कारखान्यात झालेल्या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला.

Swapnil Shinde

Vijapur maize processing unit tragedy : कर्नाटकातील एक मोठी दुर्घटना घडली आहे. विजयपुरा येथील मका प्रक्रिया कारखान्यातील अनेक मजूरांवर पोत्यांचा ढीग पडल्याने ६ मजूरांचा मृत्यू झाला. इतर जखमींचे प्राण वाचविण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे.

विजयपुरामधील औद्योगिक परिसरातील राजगुरू फूड्सच्या गोदामात ही घटना घडली. मका प्रक्रिया प्रकल्पाच्या ढिगाऱ्यात अनेक मजूर अडकल्याचे समजते. १० हून अधिक मजूर आत अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासनाच्यावतीने तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आले. त्यामध्ये ढिगाऱ्याखालून आतापर्यंत ६ मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. राजेश कुमार (२५), मुखिया (२६) आणि रामजी मुखिया (२९), राम बालक (५२) सर्व रा. बिहार आणि लुको जाधव (४५) अशी मृतांची नावे आहेत.

मक्याच्या गोण्यांच्या ओव्हरलोडमुळे दुपारी साडेचार वाजता साठवण टाकी कोसळून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. वेअरहाऊसमध्ये चार स्टोरेज पॉइंट आहेत, प्रत्येकाची क्षमता १२० टन आहे.

विजयपुराचे जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक (एसपी) यांनी घटनास्थळी भेट दिली. तीन कामगारांना आधीच वाचवण्यात आले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बचावकार्य सुरू आहे. एसडीआरएफ आणि अग्निशमन विभागाच्या जवानांनी रात्रभर बचावकार्य केले आणि जेसीबीचा वापर करून ४ मजूरांची सुटका केली. दुर्घटनेनंतर फूड प्रोसेसिंग युनिटचा मालक फरार झाला असून त्याला पकडण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी शोधमोहीम सुरू केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parliament Winter Session 2025: हिवाळी अधिवेशन २०२५: संसद पुढील अधिवेशन काळापर्यंत तहकूब; आठ महत्त्वाच्या विधेयकांना मंजुरी

Soybean Farmers Protest: हमीभावासाठी किसान मोर्चाचे लातूर बाजार समितीसमोर धरणे

Rabi Crop Insurance: रब्बी पीकविम्याकडे शेतकऱ्यांची पाठ

Natural Sugar Factory: शेतकऱ्यांना ‘एआय’चा फायदा देणारा ‘नॅचरल’ राज्यातील पहिला कारखाना: राजकुमार मोरे

Climate Change: बदलत्या हवामानास अनुकूल वाणांच्या निर्मितीची गरज

SCROLL FOR NEXT