Solar Scheme  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Solar Scheme : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या कामांना वेग द्या

Solar Energy : शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० ची अंमलबजावणी सुरू आहे.

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० ची अंमलबजावणी सुरू आहे. या योजनेत छत्रपती संभाजीनगर परिमंडलात सुरू असलेल्या प्रकल्पांची कामे दर्जेदार व वेगाने पूर्ण करा, असे निर्देश राज्याच्या अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांनी दिले.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० मध्ये फुलंब्री तालुक्यातील वरखेडी येथे ६ मेगावॉट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे. २२ नोव्हेंबर २०२४ रोजी कार्यान्वित करण्यात आलेल्या या प्रकल्पातून आळंद व बोरगावमधील ६५० शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे.

या प्रकल्पास अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांनी बुधवारी (ता. १२) भेट देऊन पाहणी केली. या वेळी सहसचिव (ऊर्जा) नारायण कराड, महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट, विशेष कार्य अधिकारी (ऊर्जा) संतोष सांगळे, अधीक्षक अभियंता संदीप दरवडे, कार्यकारी अभियंता भूषण पहूरकर, शैलेश कलंत्री, एमईआयएलचे महाव्यवस्थापक अभिषेक गांगुली, व्यवस्थापक रवींद्र इंगळे, प्रकल्प व्यवस्थापक प्रशांत चव्हाण आदी उपस्थित होते.

छत्रपती संभाजीनगर परिमंडलात या योजनेत सुरू असलेल्या कामांचा अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांनी आढावा घेतला. तसेच उर्वरित कामे दर्जेदार व वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. सौर प्रकल्प जोडण्यात येणाऱ्या महावितरणच्या उपकेंद्रांतील आनुषंगिक कामेही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्याचा हेतू

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० ही राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेत शेतकऱ्यांना दिवसा व अखंडित वीजपुरवठा करण्याचे लक्ष्य आहे. एकूण १६ हजार मेगावॅट क्षमतेचे सर्व प्रकल्प मार्च

२०२६ पर्यंत पूर्ण होऊन राज्यात शेतीसाठी पूर्णपणे सौर ऊर्जेवर निर्माण झालेल्या विजेचा पुरवठा होईल. या योजनेत एकाच हेतूने राज्यात विविध ठिकाणी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहेत. अशा विकेंद्रित स्वरूपातील हा जगातील सर्वांत मोठा सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प आहे. यासाठी स्वतंत्र कृषी वीजनिर्मिती कंपनी स्थापन करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payment Delay: राज्यातील १३२ कारखान्यांनी थकविली ‘एफआरपी’ रक्कम

Maharashtra Nagar Parishad Nagar Panchayat Elections Result: राज्यातील २८८ नगरपरिषदा, नगरपंचायतींचा आज फैसला

Farmer Services: शेतकरी घरबसल्या करू शकतात युरिया बुकिंग

US Tarrrif: अमेरिकेच्या टेरिफमुळे मत्स्य निर्यातीत घट

Soybean Procurement: शेतकरी उत्पादक कंपन्यांची सोयाबीन खरेदी सुसाट

SCROLL FOR NEXT