Gram Swacchata Abhiyan Agrowon
ॲग्रो विशेष

Gram Swacchata Abhiyan : ग्राम स्वच्छता अभियानाच्या तपासणीची गैरहजरी भोवली

Department Level Inspection : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत विभागस्तरीय तपासणीसाठी आयुक्त कार्यालयातील पथक कारंजा तालुक्यातील गायवळ या गावात आले असता संबंधित ग्रामसेवकच गावात उपस्थित नव्हता.

Team Agrowon

Washim News : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत विभागस्तरीय तपासणीसाठी आयुक्त कार्यालयातील पथक कारंजा तालुक्यातील गायवळ या गावात आले असता संबंधित ग्रामसेवकच गावात उपस्थित नव्हता. त्यामुळे पथक कोणत्याही तपासणीविना माघारी फिरले.

या बाबीची गंभीर दखल घेत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी गावाच्या ग्रामसेवकासह जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, तीन शिक्षक आणि गटविकास अधिकाऱ्यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश दिले.

गायवळ येथील ग्रामसेवक एस. व्ही. राठोड यांच्या दोन वेतनवाढ तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्याचे तसेच पर्यवेक्षणीय कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून गटविकास अधिकारी प्रफुल्ल तोटेवाड यांच्या सेवा पुस्तकेत नोंद घेण्याचे निर्देश वाघमारे यांनी दिले.

जिल्हा परिषदेची सुत्रे हाती घेतल्यानंतर मुख्य कार्यकारी वाघमारे यांची ही पहिली कार्यवाही केली असून यामुळे कामात हलगर्जीपणा करणाऱ्‍या कर्मचा‍ऱ्यांच्या मनात धडकी भरली आहे.

या अभियानांतर्गत जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांक पटकावलेल्या कारंजा येथील गायवळ आणि प्रथम क्रमांक पटकावलेल्या मालेगाव तालुक्यातील ढोरखेडा गावाची तपासणी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या पथकामार्फत करण्यात येत होती. त्यानुसार अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त (विकास) राजेंद्र फडके हे पथकासह गायवळ गावाची तपासणी करण्यासाठी गावात गेले होते.

मात्र, ग्रामसेवक इतर संबंधित कर्मचारी गैरहजर आढळून आले. गावातील शाळा व अंगणवाडी सुद्धा बंद असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. या सर्व प्रक्रियेचा मुख्य भाग असलेला ग्रामसेवक गावात नसल्याने तपासणी न करता पथकाला परतावे लागले. गटविकास अधिकारी तोटेवाड हे सुद्धा गावात उशिरा पोहोचल्याने उपायुक्त फडके यांनी नाराजी व्यक्त केली.

चार शिक्षकांना कारणे दाखवा

स्वच्छता अभियानाच्या तपासणी दरम्यान गायवळ येथील जिल्हा परिषद शाळा बंद असल्यामुळे तसेच शाळेत एकही शिक्षक उपस्थित नसल्यामुळे शाळेचे मुख्याध्यापक भारत येवले, शिक्षक श्रीकांत सावके, शंकर धनगर, दिनेश गाडगे यांनाही कर्तव्यात कसूर केल्याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश देण्यात आले.

अंगणवाडी सेविका पदमा हरिहर जगताप व मदतनीस मंगला आनंदा इंगळे यांना नोटीस बजावण्याचे व दोषी आढळल्यास कारवाई करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT