Shaktipeeth Highway Issue Rally
Shaktipeeth Highway Issue Rally Agrowon
ॲग्रो विशेष

Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्ग रद्द करा

Team Agrowon

Kolhapur News : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ठरल्याप्रमाणे १०० व ५० रुपयांचा दुसरा हप्ता मिळावा तसेच शक्तिपीठ महामार्ग रद्द व्हावा. यासाठी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त बुधवारी (ता. २६) कागल ते कोल्हापूर पायी कैफियत पदयात्रा काढण्यात आली.

या वेळी माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, की सरकारने शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळलेला नाही. सध्या जाहीर केलेला हमीभाव ही केवळ तडजोड आहे. सबसिडी देऊन भाव नियंत्रित करत असल्यामुळे शेतकरी देशोधडीला लागलेला आहे.

सरकारने शेतकरी हिताचे निर्णय घ्यावेत यासाठी ही कैफियत यात्रा काढली असल्याचे त्यांनी सांगितले. मागील वर्षी तुटलेल्या उसाची एफआरपी अधिक १०० रुपये मिळावेत अशी आमची मागणी होती. त्यासाठी आम्ही शेतकऱ्यांनी महामार्ग रोखला.

ज्या कारखान्याने तीन हजार रुपये दिले त्यांनी जादा पन्नास रुपये शेतकऱ्यांना द्यायचे अशी मागणी ठरली होती. त्या वेळी हा प्रस्ताव मांडण्यात आला होता. तो जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने मिटवण्यात आला होता. परंतु राज्य सरकारने याला परवानगी न दिल्याने शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत.

या वेळी राजू शेट्टी यांनी जुलैपासून शेतकरी कर्ज मुक्ती आंदोलन करणार असून, त्यासाठी राज्याचा दौरा करणार असल्याचे सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Turmeric Crop Management : हळद पिकाचे खत, सिंचन व्यवस्थापन

Monsoon Session 2024 : शेती क्षेत्रावरील खर्चात १५ टक्क्यांची कपात

Milk Price Protests : सातवा दिवस दूध उत्पादकांसाठी, विधीमंडळाचा दारात महाविकास आघाडीची निदर्शने

Mahabeej Managing Director Transfer : सचिन कलंत्रेंची बदली रद्द करा

Fruit Crop Farming : तेंडोळीच्या वानखडे यांनी धरली फळबागांची कास

SCROLL FOR NEXT