Training Program Agrowon
ॲग्रो विशेष

Aromatic Plants : सुगंधी वनस्पतीमध्ये उत्पन्न दुप्पट करण्याची क्षमता : डॉ. खर्चे

MIDH : एकात्मिक उद्यान पिके विकास अभियान (MIDH) प्रकल्पातंर्गत ‘सुगंधी वनस्पती लागवड तंत्रज्ञान’ या विषयावर एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम कारंजालाड तालुक्यातील चांदई येथे नारडस शेतकरी उत्पादन कंपनीचे संचालक लक्ष्मण हिरे यांच्या शेतावर झाला.

Team Agrowon

Akola News : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील नागार्जुन वनौषधी उद्यान, सुपारी व मसाला विकास संचालनालय कालीकत यांच्या संयुक्त विद्यमाने एकात्मिक उद्यान पिके विकास अभियान (MIDH) प्रकल्पातंर्गत ‘सुगंधी वनस्पती लागवड तंत्रज्ञान’ या विषयावर एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम कारंजालाड तालुक्यातील चांदई येथे नारडस शेतकरी उत्पादन कंपनीचे संचालक लक्ष्मण हिरे यांच्या शेतावर झाला.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे अध्यक्षस्थानी होते. नागार्जुन वनौषधी उद्यान विभागाचे प्रमुख डॉ. नितीन पतके, डॉ. अमित देशमुख व सहायक प्रा. डॉ. मनीष वाकोडे, वरिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. बालकिशोर मुराडी उपस्थित होते.

चांदई येथील नारडस शेतकरी उत्पादन कंपनीचे संचालक लक्ष्मण हिरे, युवा उद्योजक कुलदीप खडसे, महेश लेकुरवाडे, प्रा. अजय मोटघरे, तसेच इतर ग्रामस्थ आणि खामगाव येथील युवा शेतकरी उद्योजक प्रतीक गव्हाणे, चांदई गावातील शेतकऱ्यांसोबतच मूर्तिजापूर, वर्धा, तसेच कारंजा तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.

प्रशिक्षणाची सुरुवात गवती चहा, सिट्रोनेला व तिखडी गवताच्या प्रक्षेत्र तसेच सयंत्रास भेट देऊन झाली. डॉ. पतके यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. युवा उद्योजक कुलदीप खडसे, प्रा. अजय मोटघरे तसेच प्रतीक गव्हाणे आपले सुगंधी वनस्पती लागवडीतील अनुभव कथन केले.

डॉ. खर्चे म्हणाले, पीक विविधता घडवून आणण्यासाठी शाश्वत शेती संकल्पनेतून पारंपरिक पिकांसोबतच औषधी व सुगंधी वनस्पती लागवड करून उत्पादन दुप्पट करण्याची क्षमता आहे. या कार्यक्रमांतर्गत गवती चहाचे कृष्णा सुधारित वाणाचे स्लिप्स, कृषी संवादिनी २०२४, सुगंधी तेल यांची निविष्ठा वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी बबन नाचोने, दिनेश घावडे यांनी सहकार्य केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election : शेतकरी संघटनांना भुलवतेय आमदारकीची मोहमाया

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची ससेहोलपट

Sanjay Kulkarni Death : ‘जलसंपदा’ला दिशा देणारे संजय कुलकर्णी यांचे निधन

Rabi Crop Loan : रब्बीसाठी पीक कर्जाचे ६८५ कोटींचे उद्दिष्ट

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्रात थंडीची चाहूल

SCROLL FOR NEXT