Kharif Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Crop : आठवडाभरातील पावसाने खरीप पिकांना दिलासा

Team Agrowon

Solapur News : पावसाने दिलेली ओढ खरीप पिकांना सोसवेनाशी झाली होती. मात्र, गेल्या आठवडाभरात कमी-अधिक प्रमाणात जिल्ह्यात झालेल्या पावसाने पिकांना दिलासा मिळाला आहे. परंतु गेल्या आठवडाभरातील पावसाची मंडल व तालुकानिहाय आकडेवारी पाहता, पावसाचे असमान वितरण दिसून येत आहे. त्यामुळे आणखी पावसाची गरज आहे.

गेल्या आठवड्याच्या अखेरपर्यंत जिल्ह्यात ९२ टक्क्यांहून अधिक क्षेत्रावर पेरणी झाली होती. पिकांच्या चांगल्या उगवणीनंतर आंतरमशागतीची कामे संपल्याने पिकांना पावसाची गरज होती. मात्र, पावसाने १० ते १२ दिवस ओढ दिल्याने पिके धोक्यात येण्याची चिन्हे होती.

परंतु सोमवारपासून पावसाला सुरवात झाली. जुलै महिन्याच्या १३ दिवसांत कमी-अधिक प्रमाणात जिल्ह्यात एकूण ६१.१ मिलिमीटर पाऊस पडला आहे. त्यामुळे पिकांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्याची या महिन्यातील सरासरी ९४.८ मिलिमीटर आहे.

सोमवारी व मंगळवारी चांगला पाऊस पडला. त्यानंतरही कमी प्रमाणात पाऊस पडला आहे. त्यामुळे पिकांना पुन्हा उभारी मिळाली असली तरी मंडल व तालुकानिहाय आकडेवारी पाहता सर्वत्र समान पाऊस झाल्याचे चित्र नाही. त्यामुळे कमी पाऊस पडलेल्या मंडलातील पिकांना आणखी पावसाची गरज आहे.

बहुतांश मंडलात कमी पाऊस

चालु आठवड्यात सोमवारी १९.९, तर मंगळवारी १३.१ मिलिमीटर पाऊस पडला. सोमवारी दहा मंडलांत ५० मिलिमीटरहून अधिक पडला. परंतु बहुतांश मंडलात कमी पाऊस पडला. उदा. मंगळवेढा मंडलात ९० मिलिमीटर तर त्याच तालुक्यातील भोसे मंडलात केवळ ६.५ मिलिमीटर पाऊस पडला. तर उर्वरित सहा मंडलात चांगला पाऊस झाला. अशीच स्थिती अन्य तालुक्यात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Edible Oil Rate : तीस लाख टन साठा संपेपर्यंत खाद्यतेलाच्या किमती वाढवू नका

Vasantdada Sugar : ‘वसंतदादा शुगर’च्या धर्तीवर चालणार सिट्रस इस्टेटचा कारभार

Shwetkranti 2.0 : केंद्रीय मंत्री शहांच्या हस्ते ‘श्‍वेतक्रांती २.०’चा प्रारंभ

Bioenergy Production : जैवऊर्जा निर्मितीचा पहिला टप्पा फसला

Monsoon Update : मॉन्सूनच्या परतीसाठी पोषक स्थिती

SCROLL FOR NEXT